सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रांवर कंपन्या बंद करण्याची वेळ

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्या  जमीन खरेदीबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. याचवेळी आणखी एक वृत्त हाती आले आहे. त्यांनी आपल्या काही कंपन्यांना टाळे ठोकल्याचे पुढे आले आहे.

Updated: Nov 6, 2014, 12:07 PM IST
सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रांवर कंपन्या बंद करण्याची वेळ title=

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्या जमीन खरेदीबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. याचवेळी आणखी एक वृत्त हाती आले आहे. त्यांनी आपल्या काही कंपन्यांना टाळे ठोकल्याचे पुढे आले आहे.

आमच्या सहयोगी डीएनए या इंग्रजी वृत्तपत्रानुसार रॉबर्ट वाड्रा यांच्या १२ कंपन्यांपैकी चार कंपन्या बंद केल्या आहेत. या कंपन्या राजस्थान आणि हरियाणामधील असल्याचे सांगितले जात आहे.

रॉबर्ट वाड्रा यांनी ६ कंपन्या राज्यस्थान आणि हररियाणामध्ये सुरु केल्या होत्या. त्यातील चार बंद केल्या आहेत. यामध्ये लाईफलाईन अॅग्रोटेक प्रा. लि., ग्रीनवेअर अॅग्रो प्रा. लि., राईटलाईन अॅग्रीकल्चर आणि प्राईमटाईन अॅग्रो प्रा. लि. यांचा समावेश आहे.

डीएनएच्या वृत्तानुसार आणखी काही कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या सर्व कंपन्यांची सुरुवात २०१२ मध्ये करण्यात आली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.