'भाजप-राष्ट्रवादी साथ-साथ है, ये अंदर की बात है'

 विश्वासदर्शक ठरावावरून भाजप, शिवसेना आणि शांत बसलेल्या काँग्रेसची चिडचिड होत असली, तरी राष्ट्रवादी मात्र शांत आहे. राष्ट्रवादी सरकारला अडचणीत आणण्यासाठी कोणतं टायमिंग साधणार याकडे सर्वाची नजर लागून आहे. 

Updated: Nov 12, 2014, 02:14 PM IST
'भाजप-राष्ट्रवादी साथ-साथ है, ये अंदर की बात है' title=

मुंबई :  विश्वासदर्शक ठरावावरून भाजप, शिवसेना आणि शांत बसलेल्या काँग्रेसची चिडचिड होत असली, तरी राष्ट्रवादी मात्र शांत आहे. राष्ट्रवादी सरकारला अडचणीत आणण्यासाठी कोणतं टायमिंग साधणार याकडे सर्वाची नजर लागून आहे. 

भाजप-राष्ट्रवादी साथ-साथ है, ये अंदर की बात है
'भाजप-राष्ट्रवादी साथ-साथ है, ये अंदर की बात है', असा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे. वास्तविक विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने पार पडल्याने राष्ट्रवादीचा स्पष्ट, अस्पष्ट, बाहेरून, आतून सरकारला कसा पाठिंबा आहे, हे मात्र कळू शकलेलं नाही.

भाजप, शिवसेना, काँग्रेसची चिडचिड, मात्र राष्ट्रवादी शांत
भाजपाला विधानसभा निवडणुकीत १२२ जागा मिळाल्या, तेव्हा सुरूवातीला आपण भाजपला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचं राष्ट्रवादीने जाहीर केलं, आणि ६३ जागा जिंकून आलेल्या शिवसेनेची हवा काढली.

शिवसेना आणि भाजपची हवा काढली
शिवसेनेची हवा काढली मात्र भाजपा हवेत गेली, तेव्हा काँग्रेसने शिवसेनेसोबत येऊन सरकार स्थापन करता येईल का याची चाचपणी करा, असा प्रस्ताव ठेवलाय असं सांगून, हवेत गेलेल्या भाजपाला राष्ट्रवादीने जमिनीवर आणलं, आणि सत्ता स्थापनेच्या चाव्या राष्ट्रवादीने आपल्या हातात घेतल्या.

भाजप-शिवसेनेतला वाद वाढला
शिवसेना-भाजपमधील मंत्रिपद वाटपाचा वाद आणखी वाढत गेला, तो विश्वासदर्शक ठरावाच्या शेवटच्या तासापर्यंत कायम होता. या काळात राष्ट्रवादी शांत होती, मात्र राष्ट्रवादीला बाहेरून पाठिंब्याचा निर्णय कायम आहे का? असं विचारल्यावर राष्ट्रवादीने पुन्हा शिवसेना टोला लगावत सांगून टाकलं, आम्ही आमच्या निर्णयावर  कायम असतो, त्यात फेरबदल होत नाही, मात्र हा पाठिंबा पाच वर्षासाठी कायम असेलच असं नाही, सरकारने आमच्या भूमिकेविरोधात भूमिका घेतली, तर काहीही होऊ शकतं असं राष्ट्रवादीने सांगून टाकलंय.

सर्व कोमात राष्ट्रवादी मात्र जोमात
मात्र आता विश्वासदर्शक ठरावावरून भाजप, शिवसेना आणि शांत बसलेल्या काँग्रेसची चिडचिड होत असली, तरी राष्ट्रवादी मात्र शांत आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.