'लॉक्ड, लोडेड एंड पैक्ड विथ फायर' म्हणत निर्मात्यांनी शेअर केला 'पुष्पा 2' चित्रपटाचा नवीन पोस्टर

'पुष्पा 2: द रुल' चा पूर्वार्ध पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 8, 2024, 09:37 PM IST
'लॉक्ड, लोडेड एंड पैक्ड विथ फायर' म्हणत निर्मात्यांनी शेअर केला 'पुष्पा 2' चित्रपटाचा नवीन पोस्टर  title=
Pushpa 2: The Rule : अभिनेता अल्लू अर्जनचा 'पुष्पा 2: द रुल' हा 2024 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची चाहते गेल्या काही दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील गाणी देखील सोशल मीडियावर रिलीज झाली आहेत. ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सकुता वाढली आहे. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे. 'पुष्पा 2: द रुल' चा पूर्वार्ध पूर्ण झाला आहे. 
 
'पुष्पा 2: द रुल' च्या निर्मात्यांनी त्याच्या इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे नवीन पोस्ट शेअर केले आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, 'पुष्पा 2: द रुल' चा पहिला भाग  'पुष्पा 2: द रुल' भरलेला आहे. इतिहास घडताना पाहण्यासाठी सज्ज व्हा. कारण पुष्पा भारतीय बॉक्स ऑफिसवर तुफान झेप घेणार आहे. प्रेक्षकांना देखील या चित्रपटाचा पहिला भाग खूप आवडला होता. 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
'पुष्पा 2: द रुल'मधील गाण्याला प्रेक्षकांकडून पसंती
 
अभिनेता अल्लू अर्जुन पुन्हा एकदा 'पुष्पा 2: द रुल'मध्ये त्याच्या लोकप्रिय पात्र पुष्पराज म्हणून दिसणार आहे. कथेमध्ये नवीन आव्हाने आणि संघर्षांचा समावेश देखील असणार आहे. जो प्रेक्षकांना प्रचंड आवडणार आहे. त्यामुळे थिएटरवर देखील गर्दी असणार आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना आणि फहद फासिल देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांना देखील खूप आवडली आहेत. 'SOOSEKI' या गाण्याला Youtube वर 250 मिलियन अधिक लोकांनी पाहिले आहे. 
 
 
रिलीजपूर्वीच चित्रपटाने केली मोठी कमाई
 
अल्लु अर्जुनच्या 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटाने रिलीजपूर्वीच मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. 'पुष्पा 2: द रुल' हा 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमारने केले होते.  'पुष्पा 2: द रुल' चे देखील दिग्दर्शन त्यांनीच केले आहे.