नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या कूपवाडा जिल्ह्यात कालपासून सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत जवानांनी ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या चकमकीत 2 जवानही शहीद झाले असून एका अधिका-यासह ४ जवान जखमी झाले आहेत.
उत्तर काश्मीरमधील कूपवाडा जिल्ह्यात चौकीबल भागातील मरसारी गावात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती शुक्रवारी सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय रायफल्स, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि राज्य पोलिसांच्या विशेष कृती गटाच्या सहाय्याने संयुक्तरित्या शोधमोहिम हाती घेतली.
दहशतवादी लपून बसलेल्या घराला पोलिसांनी वेढा देताच दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यावर जवानांनीही चोख प्रत्यूत्तर दिलं.