नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांना शुक्रवारी ट्विटरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण गनी यांनी जे उत्तर दिलं, त्यामुळे दोन्ही नेते ट्विटरवर ट्रेण्डिंगमध्ये आले.
पंतप्रधान मोदी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छासह 'तुम्हाला दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो असं ट्विट केलं.' पण यावर गनी यांनी उत्तर देत म्हटलं की, 'खरंतर माझा वाढदिवस 19 मे रोजी असतो. पण तरीही तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद.'
त्यामुळे मोदींकडून ही चूक कशी झाली याचं ट्विटरवर ट्रेंड सुरू झाला. इंटरनेटवर अशरफ गनी यांचा वाढदिवस १२ फेब्रुवारी रोजी असल्याचीच माहिती आहे. त्यामुळे मोदींनी कदाचित ही तारीख पाहुनच शुभेच्छा दिल्या का यावर चर्चा सुरू झाल्या.
Happy birthday @ashrafghani. Praying for your long life & exceptional health and a joyful journey ahead.
— Narendra Modi (@narendramodi) February 12, 2016
@narendramodi Greetings from Munich Mr. PM. Although, my Birthday is on 19th May, but I'd still like to thank you for your gracious words :)
— Ashraf Ghani (@ashrafghani) February 12, 2016