मुंडे-महाजन कुटुंबासाठी `3` चा आकडा `घातक`

नियतीच्या अजब खेळाचा फटका मराठवाडयाला बसलाय. देशपातळीवर ऐन भरात असतांनाच मराठवाडयाच्या तीन नेत्यांचा मृत्यू झालाय. त्यातच मुंडे-महाजन कुटुंबासाठी 3 हा आकडा घातक ठरलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 3, 2014, 02:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
नियतीच्या अजब खेळाचा फटका मराठवाडयाला बसलाय. देशपातळीवर ऐन भरात असतांनाच मराठवाडयाच्या तीन नेत्यांचा मृत्यू झालाय. त्यातच मुंडे-महाजन कुटुंबासाठी 3 हा आकडा घातक ठरलाय.
3 मे 2006 ला प्रमोद महाजन यांचं हिंदूजा हॉस्पिटलमध्ये निधन झालं. त्यांचा धाकटा भाऊ प्रवीण महाजननं त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. तर त्याच्याच एक महिन्यानंतर 3 जून 2006ला प्रमोद महाजन यांचे पीए विवेक मोइत्रा यांचा मृतदेह आढळला. तर प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन हा ड्रग्जच्या ओव्हरडोजनं बेशुद्धावस्थेत आढळला. या दोन घटना...
तिसरी घटना 3 मार्च 2010- ब्रेन हॅमरेजमुळं प्रवीण महाजन यांचं ज्युपिटर डॉस्पिटलमध्ये निधन झालं.
केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे हे महाजन कुटुंबियांचे नातेवाईक. मुंडेच्या पत्नी प्रज्ञा मुंडे या प्रमोद महाजन यांच्या भगिनी... आज 3 जून 2014 ला गोपीनाथ मुंडे यांचं दिल्लीत कार अपघातानंतर निधन झालं.
मुंडे-महाजन कुटुंबासाठी 3 चा आकडा `घातक`
> 3 मे 2006 - प्रमोद महाजन
यांचं हिंदुजा रुग्णालयात निधन
प्रमोद महाजनांवर बंधू प्रवीण
महाजन यांनी झाडल्या
होत्या गोळ्या
> 3 मार्च 2010 - प्रवीण महाजन
यांचं ज्युपिटर रुग्णालयात
प्रवीण महाजन यांच्यावर
बंधू प्रमोद महाजनांच्या हत्येचा
ठपका
> 3 जून 2014 - गोपीनाथ मुंडे
यांचं दिल्लीत अपघाती निधन
महाजन कुटुंबियांचे मेहुणे
गोपीनाथ मुंडे

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.