तुमच्या आणि तुमच्या जोडीदारात राशींचं एक नातं असतं असं म्हटलं जातं. तसं सर्वांचंच जुळून येतं, जमतं असं म्हणायला हरकत नाही, पण थोडाफार दुरावा, त्यानंतर जवळीकता वाढण्यास वेळही लागतो.
राशीनुसार स्वभाव ठरतो असं सांगतात, यात राशीनुसार आवडी-निवडी, सवयी, बोलणं, दुखावणं, समजून घेणं आलंच. तुमच्या राशीचा स्वभावाचा परिणाम तुमच्या लव्ह लाईफवरही अनेक वेळा दिसून येतो, तेव्हा तुमची रास तुमच्या लव्ह लाईफबद्दल काय म्हणते ते पाहा.
मेष : मेष राशीचे लोक प्रभावशाली असतात. मेष राशीच्या लोकांना जेवढा सेक्समध्ये रस असतो, तेवढाच त्यांना प्रणयातही असतो, म्हणजेच ते जास्तच रोमँटीक असतात. एकदा का त्यांचा जीव जोडीदारात गुंतला तर ते तिच्या किंवा त्याच्यासाठी काहीही करू शकतात, म्हणजेच प्रेमासाठी वाट्टेल ते. प्रेम करण्याच्या बाबतीत मेष राशीचे लोक एक पाऊल पुढे असतात, प्रणय निवेदन करण्यात त्यांना तसा जास्त वेळ लागत नाही.
वृषभ : वृषभ राशीचे लोक संवेदनशील असतात, त्यांच्यावर शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो. मात्र त्यांची संवेदनशीलता त्यांना जोडीदारावर भरपूर प्रेम करण्यास शिकवते. वृषभ राशीची व्यक्ती प्रणयातही रस घेते. एवढंच नाही, चुंबन, कुरवाळणे आणि मिठी मारणे या गोष्टीत त्यांना मोठा रस असतो. रुप, गंध आणि स्पर्श या भौतिक गोष्टींचे महत्व आणि महत्ता या लोकांना व्यवस्थित माहित असते.
मिथुन : मिथुन राशीचे लोक प्रेमात तसे शॅमेलियॉन सरड्यासारखे असतात. ते प्रेमात कधी कोणता रंग दाखवतील, हे सांगता येत नाही. त्यांची सेक्स लाईफमध्ये संकूचित नसेत, कारण याविषयी मनात आलं, ते सरळ बोलून मोकळे होतात. मिथुन राशीच्या जोडीदारासोबत जीवन जगण्याची एक कला असते, कारण ते उत्साही आणि खेळकर स्वभाव असतात, मात्र हे कलात्मक जीवन जगण्यासाठी तुमच्याकडे ते समजून घेण्याची थोडी तरी कला असली पाहिजे. मिथुन राशीचे लोक जोडीदाराला जीवनात जास्तच जास्त सरप्राईज देतात, तेवढे ते प्रयोगशीलही असतात हे नाकारता येत नाही.
कर्क : कर्क राशीच्या लोकांमध्ये तुम्हाला फार मोठा उत्साह दिसून येतो, चंद्राचा प्रभाव राशीवर असल्याने ते रोमँटिक असतात. कर्क राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास ते सेक्स लाईफमध्येही सार्थ ठरवतात, जोडीदारासोबतचा त्यांचा सेक्स, हा अत्युच्च अनुभव असतो. आंतरिक शक्ती बळकट असल्याने, नव-नवीन प्रयोग करण्यासाठी कधीच घाबरत नाहीत.
सिंह : सिंह राशीचे लोक प्रभावशाली आणि शक्तीशाली मानले जातात, जोडीदारासोबत त्याची केमेस्ट्री जुळायला थोडासा वेळ लागतो, मात्र त्यानंतर संतुलन येतं आणि त्यांच्या प्रणयातील आनंद हा दुप्पट असतो, सिंह राशींच्या लोकांना डोळे लावून विश्वास ठेवणारा जोडीदार अधिक जवळचा असतो.
कन्या : या राशीच्या व्यक्ती मधुर आणि हळव्या असतात. आपल्या जोडीदाराला काय हवे काय नको याचा ते सतत विचार करीत असतात. आपल्या जोडीदाराला बेडमध्ये जे हवे ते सोपविण्याकडे त्यांचा कल तर असतोच परंतु त्यात आपण कसे समाधानी होऊत याचाही ते विचार करतात.
तूळ : तूळ नावाच्या व्यक्तीकडून आपल्या जोडीदाराकडून अव्वाच्या सव्वा अपेक्षा असतात. मात्र ते संवेदनशील असतात हा जोडीदारासाठी प्लस पाँईट आहे. मूडमध्ये येण्यासाठी किंवा आणण्यासाठी ते प्रणयाला बराच वेळ देतात, यासाठी ते आपलं बेडरुम सुंदर वस्तूंनी सजवतात आणि वातावरणातच आधीच रोमान्स भरण्याचा प्रयत्न करतात, तूळ नावाची लोकं जेवढ्या अपेक्षा ठेवतात, तेवढ्याच ते पूर्णही करतात.
वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांसमोर जोडीदाराला जास्त खेचाखेच करण्याची संधी नसते, कारण जोडीदाराला शरण आणणे, त्यांच्यासाठी सोप काम असतं. त्यांचा हा डॉमिनन्स बेडरूममध्ये दिसून येतो, याबाबतीत ते नेहमी प्रयोगशील असतात. याबाबतीत त्याचं शस्त्र एकच असतं, ते लोक सेक्सबाबतीत अधिक ओपन असतात. मात्र गुपिते ते कधीही बाहेर येऊ देत नाहीत, त्यामुळेच त्यांच्या हालचालीत एक गांभीर्य असतं.
धनू : धनू ही रास म्हणजे होऊ द्या खर्च असते, असं त्यांच्या जोडीदाराला नक्की वाटेल, त्यांना जीवन मजेत आणि मज्जा करत जगायला आवडतं. त्यांना वेळ मजेत घालवण्यात नेहमी आवडत असतं, यामुळे त्यांचा जोडीदार त्यांच्यापेक्षाही आनंद राहतो, खर्चाच्या बदल्यात त्यांचा जोडीदार आनंदाची लयलूट करू शकतो एवढंच.
मकर : मकर या राशीचे लोक कामाच्या ठिकाणी फारच सज्जन असल्यासारखं दाखवतात, कारण ते कामाला कामाच्या वेळी महत्व देतात. मात्र रोमान्स या विषयावर ते जेव्हा घसरतात, तेव्हा त्यांना कामसूत्रच आठवतं. या राशीच्या लोकांची गंभीरतेवर रोमान्स मात करतो. ते आपल्या जोडीदारावर जीवापासून प्रेम करतात, ते खूप भावनिक असतात, यामुळे त्यांच्याशी कोणत्याही राशीची केमेस्ट्री जुळून येण्यास मदत होते.
कुंभ : कुंभ या राशीच्या लोकांना सेक्स हा भावनिक अनुभव वाटत नसला, तरी जोडीदारासोबत ते प्रामाणिक असतात. सेक्स लाईफमध्ये जास्तच जास्त वेळ रमावं असं त्यांना वाटतं, मात्र या राशीची व्यक्ती चिंतनशील असते. या राशीचा पार्टनर मिळणे हे देखील चांगल्या भाग्याचे लक्षण समजले जाते असते.
मीन : मीन राशीची व्यक्ती जोडीदाराशी एकरूप असते, मात्र जोडीदारानेही एकरूप रहावं अशी त्यांची अपेक्षा असते. जोडीदाराचा आत्मविश्वास वाढवण्याचं गमक त्यांना असतं. सेक्स लाईफ जगायला त्यांना आवडत असलं, तरी या विषयावर जोडीदाराशी मोकळेपणाने बोलायला त्यांना आवडत नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.