मुंबई : चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप मिळणे आवश्यक असते. आपल्या शरीरासाठी दररोज 7-8 तास झोप गरजेची आहे. जर झोप झाली नसेल तर संपूर्ण दिवस आऴसवाणा जातो. अपूर्ण झोप अनेक आजारांना निमंत्रण देते. सकाळी उठल्यानंतरही तुम्हाला थकवा जाणवत असेल तर याचे कारण तुमचे बिझी शेड्यूल असू शकते. कामाच्या ताणावामुळे तुम्ही पुरेशी झोप घेऊ शकत नाहीत. याचा परिणाम शरीरावर होतो. सकाळी उठून थकवा जाणवत असेल तर खालील उपाय करा
झोपण्याची वेळ कायम ठेवा - आपल्या शरीराला एका विशिष्ट वेळी झोपण्याची सवय असेल तर झोपेची वेळ बदलल्यास त्याचा परिणाम शरीरावर दिसतो. त्यामुळे योग्य वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा.
दिनक्रम बनवा - जी कामे केल्यानंतर शांत झोप मिळेल अशी कामे झोपण्याआधी जरुर करा. काहींना झोपण्याआधी पुस्तक वाचण्याची सवय असते तर काहीजण ध्यानधारणा करतात.
झोपण्याआधी गॅजेट्सचा वापर नको - झोपण्याआधी इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सचा वापर केल्यास याचा परिणाम मेंदूवर होतो तसेच झोपेवरही होतो.
खाण्यापिण्याकडे योग्य लक्ष - कॅफेन, अल्कोहोल तसेच चॉकलेट आदी पदार्थ तुमच्या झोपेत अडथळा निर्माण करु शकतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेस हे पदार्थ घेणे टाळा. दिवसा तुम्ही हे खाऊ शकता.
दिवसा झोपू नका - दिवसा झोपण्याची सवय असणाऱ्यांना रात्री लवकर झोप येत नाही. त्यामुळे दिवसा न झोपण्याची सवय लावा.