नवी दिल्ली: देशभरात सध्या स्वाइन फ्लूचं थैमान आहे. संक्रमणामुळं गर्भवती महिलांना स्वाइन फ्लूची अधिक भीती आहे. आतापर्यंत स्वाइन फ्लूनं दगावणाऱ्या महिलांमध्ये गर्भवती महिलांची संख्या जास्त आहे.
गर्भवती महिलांची प्रतिकारशक्ती शक्ती होते ज्यामुळं अशा आजारांनी त्या अधिक प्रभावित होतात. गर्भधारणेदरम्यान फ्लू वेगाने पसरतो आणि शरीराला अशक्त आणि संक्रमित बनवतो. ज्यामुळं न्युमोनिया होण्याची भीती आणि भ्रूण संकटात सापडू शकतो.
तसंच गर्भपात करतांना गर्भाशयाचा आका वाढू लागतो. महिलांमध्ये अशावेळी वाढत्या आकारामुळं डायाफ्राम आणि आतड्यांच्या जागी दबाव पडतो, ज्यामुळं आतड्यांमध्ये हवेचं प्रमाण कमी होतं. त्यामुळं असं शरीर स्वाइन फ्लूच्या संक्रमणाखाली येऊ शकतं.
ज्या महिलांना असं बाहेरचं संक्रमण होतं, त्यांना ताप, शरीराच्या वेदना, वाहतं नाक, गळा खवखवणे, सर्दी आणि शरीराच्या तापमानात सतत बदल होतांना दिसतो. तसंच त्यांना उलट्या आणि अतिसार होऊ शकतो. जर यातील कोणतंही लक्षण आपल्याला दिसलं तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचार सुरू करा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.