मुंबई : पाण्याशिवाय आपले जीवन ही कल्पना करणे शक्य नाही. पाणी पिणे हे आजारावरील मोठा उपाय आहे. डॉक्टरांच्या मते रोज किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे योग्य आहे. प्रत्येक गोष्टीचे फायदे आहेत तसेच त्याचे काही तोटेही असतात. पाणी पिण्याची योग्य पद्धत अवलंबली नाही तर आरोग्याला हाणीकारक ठरु शकते. पाणी पिण्याची योग्य पद्धतीबद्दल जाणून घ्या.
- आपल्या दिवसाची सुरुवात ही पाण्याबरोबर केली पाहिजे. आपण जितके जास्त पाणी प्याल तितके पिणे आवश्यक आहे. पाणी शराराला साफ करण्यास मदत करते. शरीराची सफाई करत नाही तर पाणी दिवसभर तुम्हाला ताजेतवाणे ठेवण्यास मदत करते.
- पाणी एकदम पिणे योग्य नाही. घोट घोट असे पाणी हळू हळू पिणे योग्य आहे.
- जेवण केल्यानंतर कमीत कमी एक तासानंतर पाणी पिणे योग्य आहे. लगेच पाणी पिऊ नका. कारण आपल्याला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आयुर्वेदात जेवणानंतर पाणी पिणे विष समजले जाते.
- कधीही उभ्यानी पाणी पिऊ नका. त्यामुळे तुमच्या घुडघ्यावर जोर पडतो. त्यामुळे अर्थराइटीस होण्याचा धोका जास्त असतो.
- तसेच फ्रिजमधील खूप थंड पाणी पिऊ नका. त्यामुळे तुमची पचन क्रिया मंदावते. जास्त थंड पाणी पिण्याची सवय धोकादायक आहे.
- जेवण केल्यानंतर तोंड आणि गळा साफ केला पाहिजे. त्यासाठी १ ते २ घोट गरम पाण्याच्या गुळण्या केल्या पाहिजेत.