स्लिम-ट्रीम राहण्यासाठी ५ सोपे उपाय

१. तुम्ही जेव्हा कपड्यांना इस्त्री कराल तेव्हा कपड्यांची बास्केट जमिनीवर ठेवा.

Updated: Jan 24, 2016, 03:32 PM IST
स्लिम-ट्रीम राहण्यासाठी ५ सोपे उपाय title=
१. तुम्ही जेव्हा कपड्यांना इस्त्री कराल तेव्हा कपड्यांची बास्केट जमिनीवर ठेवा. जेणेकरून कपडे घेण्यासाठी तुम्हाला दरवेळी खाली वाकावे लागेल.
२. आठवड्यात किमान एकदा तरी हाताने घरातील फरशी घासून स्वच्छ करा. यामुळे तुमच्या शरीराच्या सर्व भागांना व्यायाम होईल.


३. सकाळी रोज फिरायला जा. मॉर्निंग वॉकमुळे शरीर ताजेतवाने होतेच; शिवाय वजनही कमी होऊ शकते.

४. केवळ अतिखाण्याने किंवा व्यायामाच्या अभावामुळेच वजन वाढते असे नाही. काही महिलांना असलेल्या एखाद्या विकारामुळेही त्यांचे वजन वाढू शकते. म्हणून महिलांनी आपल्या डॉक्टरकडे जाऊन त्यांचा सल्ला घेणेही आवश्यक आहे.

५. वर दिलेल्या उपायांपैकी किमान २-३ उपाय रोज करा. यामुळे दिवसाला ३००-४०० कॅलरीज बर्न करायला मदत होईल