बीजेडी, जयललितांनी दिले एनडीएला समर्थनाचे संकेत

लोकसभा निवडणुकांनंतर सर्व एक्झीट पोलने एनडीए सरकार बनविणार असे अंदाज व्यक्त केल्यानंतर बिजू जनता दल आणि जयललिया यांच्या नेतृत्त्वाखालील ऑल इंडिया द्रविड मुनेत्र कळगमने एनडीएला समर्थन देण्याचे संकेत दिले आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 14, 2014, 08:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, भुवनेश्वर
लोकसभा निवडणुकांनंतर सर्व एक्झीट पोलने एनडीए सरकार बनविणार असे अंदाज व्यक्त केल्यानंतर बिजू जनता दल आणि जयललिया यांच्या नेतृत्त्वाखालील ऑल इंडिया द्रविड मुनेत्र कळगमने एनडीएला समर्थन देण्याचे संकेत दिले आहे.
बीजेडीचे नेता प्रवत त्रिपाठी यांनी संकेत दिले की, केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन झाल्यास ते समर्थन देण्यास तयार आहोत. बीजेडी एक प्रादेशिक पक्ष आहे. राज्याचा विकास सर्वात महत्त्वाचा आहे. एनडीएचे नेते ओडिशाला विशेष राज्याचा दर्जा देण्यास तयार असतील तर आम्ही त्यांना समर्थन देण्यास तयार आहोत.
दरम्यान, बीजेडीचे प्रमुख आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सांगितले की, या संदर्भात आम्ही कोणतीही चर्चा केलेली नाही. अजून आम्ही निकालाची वाट पाहत आहोत.
या शिवाय बीजेडीचे वरिष्ठ नेते जय पांडा यांनी सांगितले की, या विषयावर पक्षात चर्चा करणे गरजेचे आहे. यावर चर्चेचा निर्णय बीजेडी प्रमुख नवीन पटनायक करणार आहेत.
दुसरीकडे तामिळनाडूत अण्णा द्रमुख पक्षानेही एनडीए सामील होण्याचे संकेत दिले आहे. पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, जयललिता आणि नरेंद्र मोदी चांगले मित्र आहेत. गरज पडल्यास आम्ही एनडीएला समर्थ देऊ शकतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.