`आपल्या मर्यादेत रहा`, मोदींचा राहुल गांधींना थेट इशारा

`आपल्या मर्यादेत रहा`, असा रोखठोक इशारा भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना दिला आहे.

Updated: Apr 27, 2014, 11:24 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, गुजरात
`आपल्या मर्यादेत रहा`, असा रोखठोक इशारा भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना दिला आहे. `राहुल गांधी सारखं खोटं बोलून माझ्या विरूद्ध नको तसे खोटे आरोप लावत आहेत`. या कारणानेच मोदींनी राहुल यांना मर्यादेत राहून टीका करण्याचा इशारा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी गुजरातमध्ये बोलत होते.
3डी होलोग्राम टेक्नोलॉजीचा वापर करत मोदी भाषण करत होते. मोदी बोलताना म्हणाले, `राहुल यांनी माझ्यावर खोटी टीका करण्याऐवजी लोकांना काँग्रेसने केलेल्या कामाचा हिशोब द्यावा. तसेच काळयापैशांच्या प्रकरणात पुण्याचे व्यापारी हसन अली यांना काँग्रेसनेच वाचवले. याचा दाखला देत, १० जनपथवर पैशांचा सौदा होतो`, असा सणसणीत आरोप मोदींनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींवर केला.
या भाषणात मोदी पुढे म्हणाले, `लोकांना देशातील काळ्यापैशाचा हिशोब हवा आहे. पण सोनिया आणि राहुल गांधी या बाबत एक शब्द देखील बोलत नाही. लोकांना देखील कळू दे, हा काळा पैसा कोणाचा आहे. हेच कारण आहे की, काँग्रेस प्रणीत युपीए सरकार हे निष्क्रिय ठरले आहे`, अशा तिखट शब्दांत राहुल गांधीवर नरेंद्र मोदींनी तोंडसुख घेतलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.