यमदूत आळस!

आजच्या धावपळीच्या जीवनात हे लोक पैसा कमावतात आणि तो तेव्हडाच खर्च करतात...त्यांच्या या जीवनशैलीमुळे पोटाचा आकार कधी वाढतो हेत्यांच्या लक्षातच येत नाही..

Updated: Mar 30, 2013, 12:21 AM IST

www.24taas.com
आळशी लोकांनो सावधान !

आळस ठरु शकतो जीवघेणा !

१५.६ टक्के आळशी भारतीयांमध्ये तुम्ही तर नाही ना ?
हा कार्यक्रम तमाम आळशी लोकांसाठी असून त्यांना या ना त्या कारणामुळे आरोग्याची चिंता सतावत असते...आजच्या धावपळीच्या जीवनात हे लोक पैसा कमावतात आणि तो तेव्हडाच खर्च करतात...त्यांच्या या जीवनशैलीमुळे पोटाचा आकार कधी वाढतो हेत्यांच्या लक्षातच येत नाही...पण आता अभ्यासाअंती जी माहिती समोर आलीय ती पहाता आराम करता करता कायमचाच आराम घेण्याची वेळ येण्याची शक्य़ता नाकारता येत नाही..
आळस आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे भारतीयांच आरोग्य धोक्यात आलं आहे..आज घरातील वातावरण शुद्ध राहिलं नाही...माणूस घराबाहेर पडला तर तो सुखरुप घरी परत येईल याची खात्री नसते...कारण भारतात सर्वाधिक रस्ते अपघात होतात...पण तसं बघायला गेल्यास ह्रदयरोग असो की, लठ्ठपणा, डायबेटीज असो की ब्लडप्रेशर या प्रत्येक रोगाचं मुळ हे आळसामध्ये आहे..जो तुम्हाला व्यायामापासून दूर ठेवतो..एव्हडच नव्हे तर आळस तुमच्या रिफ्लेक्स सिस्टीमवर परिणाम करतो आणि त्यामुळे अपघात होतात..जगभरातील अनेक आरोग्य विषय जनरलमधून प्रसिद्ध झालेल्या सर्वेक्षणाच्या आकड्यांवरुन हे आता सिद्ध झालंय की सर्वात आळशी आणि सर्वात फिट देश कोणते?
आपण सारेचजण आळशी आणि लठ्ठ लोकांवर हसण्यात धन्यता मानतो.. चित्रपटातल्या या व्यक्तीरेखांना पाहून आपण पोटधरुन हसतो पण स्वत:च्या सवयी बदलत नाहीत.. आणि त्यामुळेच भारतीयांसमोर उभ्या ठाकलेल्या या नव्या संकटाबद्दल लोकांना जागृत करण्याची वेळ आलीय...ते संकट नेकमं कोणतं आहे ते पहणार आहोत मात्र त्यापूर्वी तुमच्या सर्वात मोठे
दहा शत्रू कोण आहेत त्याची अगोदर ओळख करुन घेऊया..

भारतातील लोकांचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे ते .. खाण्यापिण्यावर नियंत्रण नसणं, वजनावर नियंत्रण नसणं, वाढलेला पोटाचा घेर , घरातली दुषित हवा, आणि आळसामुळे व्यायाम न करणं यामुळे हा धोका वाढत चाललाय आणि भविष्यातही हे संकट फार मोठं रुप धारण करणार आहे.. याच आळशीपणाचा परिणाम आयुर्मानावरही होताना दिसतोय.. दक्षिण आशियायी देशांमधील लोकांचं कमी झालेलं आर्युमान याचं उत्तम उदाहरण आहे..
भारतातील लोकांचं सरासरी आयुर्मान ६५.२ वर्ष एवढं आहे. पाकीस्तानातील लोकांचं सरासरी आयुर्मान ६५.७ वर्ष आहे. बांग्लादेशमधील लोकांचं सरासरी आयुर्मान ६९ वर्ष आहे. नेपाळमधील लोकांचं सरासरी आयुर्मान ६९.२ वर्ष आहे. भूतानमधील लोकांचं सरासरी आयुर्मान ६९.४ वर्ष आहे. श्रीलंकेतील लोकांचं सरासरी आयुर्मान ७५.५ वर्ष आहे. चीनमधील लोकांचं सरासरी आयुर्मान ७५.७ वर्ष आहेअर्थात तुमचं आयुर्मान कमी करण्यात केवळ आळस हेच प्रमुख कारण नसलं तरी तरी गेल्या काही वर्षात आळस हेच एक महत्वाचं कारण बनत चाललय..
जगातील प्रतिष्ठीत मेडिकल जनरल LANCETच्या शोध प्रबंधानुसार जगभरात ३१.१ टक्के लोक आळशी आहेत. आणि हि संख्या वाढतच चाललीय.. ही मृत्यूची मोठी करणे असले तरी त्यांच्या मुळाशी आळस हेच एक प्रमुख कारण असल्याचं समोर आलं आहे.. आज पर्यंत इतरदेश ज्या संकटाशी सामना करत होते ते संकंट आता भारतात दाखल झालय..