अंतराळातून सोन्याची बरसात!

आजपर्यंत ज्या धुमकेतूंकडं विध्वंस म्हणून बघीतलं जातं होतं....त्या धुमकेतूमध्ये कुबेराचा खजिना दडला असल्याचं आता उघड झालंय...त्यामुळे माणसाचं नशिब बदलून जाणार आहे...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 23, 2012, 11:29 PM IST

www.24taas.com, मुंबई
धुमकेतू… उल्का… अंतराळात फिरणाऱ्या मोठमोठ्या शिळांना आपण वेगवेगळ्या नांवांनी ओळखतो. विशेष म्हणजे याविषयी अनेक दंतकथाही सांगितल्या जातात. अशाच एखाद्या धुमकेतूशी पृथ्वीची टक्कर होवून सृष्टीचा अंत होईल असही दावा काहीजणांकडून केला जातोय. डायनासोरच्या युगातही अशीच घटना घडल्याचं सांगितलं जातंय. तेच माणसांच्या बाबतीतही घडण्याची शक्यता वर्तवली जातेय.
विध्वंसाच्या उंबरठ्यावर... कुबेराचा खजिना?
आजपर्यंत ज्या धुमकेतूंकडं विध्वंस म्हणून बघितलं जातं होतं त्या धुमकेतूमध्ये कुबेराचा खजिना दडला असल्याचं आता उघड झालंय. त्यामुळे माणसाचं नशिब बदलून जाणार आहे. धुमकेतूंवर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या मते धुमकेतूवर सोनं, चांदी, प्लॅटिनम, हिरे हा मौल्यवान खजिना असून धुमकेतूवर उतरण्यात माणसाला यश आल्यास पृथ्वीवर सोन, हिरे, प्लॅटिनम यांची कधीच कमतरता भासणार नाही. आज पृथ्वीच्या आजूबाजूला अशा प्रकारचे जवळपास ५० हजार धुमकेतू फिरत असून माणसाला त्याचा उपयोग करुन घेता येणार आहे. विशेष म्हणजे याच कारणामुळे आता शस्त्रज्ञांनी चंद्र आणि मंगळ ग्रहाप्रमाणेच या धुमकेतूंवर लक्ष केंद्रीत केलं आहे. ३० मीटर लांबीच्या धुमकेतूच्या तुकड्यापासून अडिच हजार अब्ज किंमतीचं प्लॅटिनम प्राप्त केलं जाऊ शकतं. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण हे वास्तव आहे आणि त्यामुळेच नासाला अनेक बड्या कंपन्यांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. कारण भविष्यात धुमकेतूवर खननाचा व्यवसाय तेजीत असणार आहे. दर २० वर्षानंतर एक धुमकेतू पृथ्वीच्या अगदी जवळ येतो. पण जेव्हा तो पृथ्वीच्या जवळून जातो तेव्हा तो एखाद्या तेजस्वी ताऱ्याप्रमाणे भासतो. धुमकेतूच्या तेजामागच्या कारणाचा उलगडा करण्यात आता शास्त्रज्ञांना यश मिळालं आहे. पृथ्वीप्रमाणेच धुमकेतूवर मोठ मोठे कडे आणि डोंगर आहेत तसेच पृथ्वी प्रमाणेच धुमकेतूवरही खनिजाचा मोठा साठा असल्याची माहिती आता समोर आली आहे. कोट्यवधी टन प्लॅटिनम, अब्जावधी टन सोनं, खनिजांचा मोठा साठा आणि पाणी... अंतराळात फिरणारे धुमकेतू हे माणसासाठी निसर्गाची देणगी असल्याचं शास्त्रज्ञांच म्हणनं आहे. या धुमकेतुंवर नैसर्गिक खनिजांचा प्रचंड साठा असून भविष्यात माणसाला त्याचा उपयोग करुन घेता येणार आहे.
धूमकेतू अंतराळात फिरत असतांना त्यावरच्या लहान मोठ्या तुकड्यांची अनेक वेळा एकमेकांशी टक्कर होते आणि त्यातून निर्माण होणारं लहान लहान तुकडे त्या धुमकेतूसोबत फिरत असतात. पण ही केवळ कल्पना नसून ते वास्तव असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केलाय. धुमकेतूवर स्पेसक्राफ्ट पाठवून त्याविषयी संशोधन करण्यात आलं आहे आणि त्याच माहितीच्या आधारे धुमकेतूवर खणण करण्याची तयारी सुरु करण्यात आलीय. अंतराळात वेगाने फिरणाऱ्या धुमकेतूवर खणन शक्य असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केलाय. धुमकेतूवर खणन करण्यासाठी आवश्यक असलेल्या मशिन्स आज उपलब्ध असून त्या धुमकेतूवर पाठविल्या जाऊ शकतात. तसेच तिथं तात्पुरतं आश्रय केंद्र उभारता येणार आहे. कारण धुमकेतूवर पाणी उपलब्ध असल्याचा दावा संशोधकांनी केलाय. ही सगळी पार्श्वभूमी पहाता आजपर्यंत ज्या धुमकेतूंना धोकादायक मानलं जातं होतं तेच धुमकेतू माणसांसाठी वरदान ठरणार आहेत.

धुमकेतूमध्ये प्रचंड खनिजसाठा उपलब्ध आहे पण चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतरही माणसासाठी चंद्र अद्यापही दूरच आहे. त्यामुळे प्रचंड वेगाने अंतराळात फिरणाऱ्या धुमकेतूवर मानवाला पाऊल ठेवणं शक्य होणार आहे का? असा प्रश्न आता विचारला जात आहे. पण वैज्ञानिकांच्या मते जेव्हा धुमकेतू पृथ्वीच्या अगदी जवळून जातो तेव्हा तो चंद्रपेक्षाही जवळ असतो. पृथ्वीच्या आजूबाजूला फिरणारे धुमकेतू. पण या धूमकेतुवर आता संशोधकांनी लक्ष्य केंद्रीत केलं आहे..वैज्ञानिकांच्या मते २०१६मध्ये एक महाकाय धुमकेतू पृथ्वीपासून केवळ अडिच लाख किलोमिटर अंतरावरुन जाणार आहे. तो धुमकेतू चंद्रापेक्षीही अधिक जवळ असणार आहे आणि त्यामुळेच नासाने त्यावर खणन करण्यासाठी लक्ष्य केंद्रीत केलं आहे. त्यासाठी विशेष स्पेसक्राफ्ट तयार केलं जात असून त्या स्पेसक्राफ्टमधून अंतराळवीर धुमकेतूवर पाठविण्यात येणार आहेत.
ते स्पेसक्राफ्ट अंतराळात झेपावल्यानंतर अवघ्या तीन मिनिटात ते अंतराळात पोहोचेल. तो धुमकेतू पृथ्वी जवळ येईपर्यंत ते स्पेस क्राफ्ट अंतराळातच राहणार असून धुमकेतूची दिशा आणि वेग याचा अभ्यास केला जाणार..धुमकेतू कोणत्य