ड्रग्ज हब मुंबई

मायानगरी मुंबईचं महत्व आजही कायम आहे. अनेकांसाठी ही स्वप्न नगरीच आहे. पण ही मायानगरी केवळ सर्वसामान्यांसाठीच महत्वाची आहे असं नाही तर ड्रग्ज माफियांसाठीही मुंबई तेव्हडीच महत्वाची असल्याचं उघड झालंय..तस्करांच्या दृष्टीने अमली पदार्थांच्या तस्करीसाठी मुंबई ही गोल्डन ट्रॅगंल बनलीय. ड्रग्ज माफियांनी मुंबईवर का लक्ष केंद्रीत केलंय ?

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 12, 2012, 09:43 PM IST

www.24taas.com,मुंबई
मायानगरी मुंबईचं महत्व आजही कायम आहे. अनेकांसाठी ही स्वप्न नगरीच आहे. पण ही मायानगरी केवळ सर्वसामान्यांसाठीच महत्वाची आहे असं नाही तर ड्रग्ज माफियांसाठीही मुंबई तेव्हडीच महत्वाची असल्याचं उघड झालंय..तस्करांच्या दृष्टीने अमली पदार्थांच्या तस्करीसाठी मुंबई ही गोल्डन ट्रॅगंल बनलीय. ड्रग्ज माफियांनी मुंबईवर का लक्ष केंद्रीत केलंय ? त्यांनी तस्करीसाठी कोणत्या नवीन पद्धती शोधून काढल्या आहे ? नशेसाठी कोणत्या औषधांची तस्करी त्यांच्याकडून केली जातेय. का होत आहे, ड्रग्ज हब मुंबई?
- ड्रग्ज माफियांच्या निशाण्यावर मायानगरी मुंबई
- ड्रग्ज तस्करीसाठी मुंबईत टाकलाय तस्करांनी डेरा
- मायानगरीतून परदेशात ड्रग्जची तस्करी
- तस्करीसाठी शोधलाय नवा मार्ग
- नशेसाठी आता औषधांचा वापर
- जगभर पसरलंय ड्रग्ज माफियांचं जाळं
- कशी रोखणार ही तस्करी ?
या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न `ड्रग्ज हब मुंबई`मध्ये करण्याचा हा प्रयत्न आहे.
मायानगरी मुंबई ही परदेशात अमली पदार्थ पाठविण्याचं केंद्र बनली आहे. अमली पदार्थांचे तस्कर केटामाईन, अल्फाझोलम या सारखे पार्टी ड्रग्ज अशियायी देश, दक्षिण अफ्रिका आणि युरोपातील देशात पाठवीत आहेत..मात्र हे ड्रग्ज पाठविण्यासाठी ते मुंबईची निवड करतात. अलिकडच्या काही महिन्यातील कस्टम विभागाने केलेल्या कारवाईवर नजर टाकल्यास ते सहज तुमच्या लक्षात येईल.
1. चेन्नईचा रहिवासी असलेला कुरुपय्या नागनाथला मुंबईच्या अंतरराष्ट्रीय विमानतळावर १२ किलो केटामाईनसह पोलिसांनी नुकतीच अटक केलीय. नशेसाठी वापरण्यात येणारं हे औषध मुंबई मार्गे क्वाललंमपुरला घेऊन जाण्याच्या तो बेतात होता..पण त्याचा डाव विमानतळावरच फसला.
2. अशाच पद्धतीने औषधांची तस्करी करतांना एका नायजेरीयन महिलेला जेरबंद करण्यात आलं होतं..ती महिला मुंबईहून २० किलो एम्फेटामाईन घेऊन इथोपीयाला जाणार होती.
3.गेल्याच महिन्यात मीठ आणि साखरेच्या नावाखाली १२ किलो मेथाक्यूलोन नावाच्या औषधाची तस्करी करण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीला अटक करण्यात आलीय..हे औषध नशेसाठी वापरण्यात येत असून ती व्यक्ती ते औषध लंडनला घेऊन जाण्याच्या प्रयत्नात होता..अलिकडच्या काळात मुंबई हे अमली पदार्थांच्या तस्करीचा गोल्डन ट्रँगंल बनला असल्याचं कस्टम विभागाचं म्हणणं आहे.
गेल्या तीन महिन्यांमध्ये मुंबईत ५० किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत..कस्टम विभागाच्या म्हणण्यानुसार देशभरातील अमली पदार्थ तस्कर मुंबईत अमली पदार्थ घेऊन येतात..त्यानंतर त्या अमली पदार्थांची अशियायी, युरोप आणि दक्षीण अफ्रेकेतील विविध देशात तस्करी केली जाते.
कस्टम विभाग,डीआरआय आणि अमली पदार्थ विरोधी विभागाकडून आधूनमधून छापामारुन अमली पदार्थ जप्त केले जातात.मात्र अमली पदार्थांच्या तस्करीचं नेटवर्क नष्ट करण्यात त्यांना अद्यापही यश आलं नाही.अमली पदार्थांची तस्करी करतांना जे लोक पकडले जातात ते य़ा धंद्यातील केवळ प्यादे आहेत.. कायद्यातील त्रूटींचा गैरफायदा घेऊन ते आपली सुटका करुन घेतात.
अमली पदार्थ तस्करीच्या धंद्यात मोठी कमाई असल्यामुळे लोक या धंद्याकडं ओढले जातात...मुंबईत काहीच अशक्य नाही हा भ्रम अनेकांनी तस्करीसाठी प्रेरीत करतो..पण कस्मट विभागाने गेल्या महिन्याभरात केलेल्या कारवाईमुळे तस्करांचं कान टवकारले आहे.

पार्टी ड्रग्ज म्हणून वापरण्यात येणा-या औषधांची निर्मिती केल्याचं महाराष्ट्रातही उघड झालं होतं...या औषधांची परदेशात तस्करी केली जातेय आणि त्यातून होणारी कमाई डोळे पांढरी करणारी आहे...काही महिन्यापूर्वीचं सांगलीत असाचं एक प्रकार उघडकीस आला होता.
अफू, गांजा, चरस, हेरॉईन, ब्राऊन शुगर या अमली पदार्थांच्या विक्रीवर बंदी असली तरी चोरी छुपे याची जगभर विक्री केली जातेय...पण आता केवळ याच अमली पदार्थांचा वापर नशेसाठी केला जातोय असं नाही..तर अमली पदार्थांच्या तस्करांनी काही औषधांची नशेसाठी विक्री सुरु केलीय..केटामाईन हे त्यापैकीच एक आहे...भूल देण्यासाठी वापरण्यात येणारं हे औषध नशेसाठी वापरलं जातंय.
महाराष्ट्रातील काही औषध उत्पादन करणा-या कंपन्यांमध्ये अशा प्रकारच्या पार्टी ड्रग्जची चोरीछुपे निर्मीती केली जात असल्याचं यापूर्वीच उघड झालं आहे. कर्जात बुडलेल्या कंपन्या अशा प्रकारचे उद्योग करीत असून झटपट पैसा कमावण्या