www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सिनेमा- आशिकी-२
दिग्दर्शक- मोहीत सुरी
कलाकार- आदित्य रॉय कपूर, श्रद्धा कपूर(शक्ती कपूरची मुलगी)
जुन्या सिनेमांचा रिमेक करणे हे काय नवीन नाही. त्यात भर पडली आहे आशिकी-२ ची. १९९०साली हीट झालेला आशिकी आजही लोकांच्या आठवणीत आहे. मात्र आशिकी-२ सिनेमा लोकांच्या पसंतीस पडला नाही.
विशेष प्रोडक्शनच्या इतर सिनेमांपेक्षा आशिकी-२ हा बराच चांगल्या धाटणीचा सिनेमा आहे असे बोलणं फोल ठरणार नाही. पण या सिनेमामध्ये रोमान्समधील कच्चेपणा सगळयांच्या डोळ्यात येतो. श्रद्धा कपूर पेक्षा आदित्य रॉय कपूरच्या अभिनयाला दर्शकांची दाद मिळत आहे.
काय आहे सिनेमाची कहाणी
दिग्दर्शक मोहित सुरीची आशिकी- २ची कहाणी राहुल जयकर (आदित्य रॉय कपूर) दारूच्या नशेने ग्रासलेला रॉकस्टार असतो आणि आरोही शिर्के (श्रद्धा कपूर) गाण्याची आवड असणारी सामान्य मुलगी. आरोही गोव्याच्या एका बारमध्ये गात असताना राहुलची नजर तिच्यावर पडते. तिच्यात तिला भावी गायिका दिसते. राहुल तिला गाण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म मिळवून द्यायला मदत करतो. एका रात्रीच ती एक मोठी स्टार होते. अर्थातच हे सगळ घडत असताना त्या दोघांमध्ये जवळीक वाढते आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण परिस्थिती त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करत नाही.
काय मायनस?
सिनेमा अपयश होण्यामध्ये श्रद्धा कपूरचा अभिनयही हातभार लावतो. श्रद्धा ही अभिनेता शक्ती कपूर यांची कन्या आहे. अभिनय त्यांच्या घरात आहे, पण याचा फायदा तिला घेता आलेला दिसत नाही. अभिनयाच्या बाबतीत ती फारच नवखी वाटते. या सिनेमामध्ये श्रद्धा कपूरला आपलं अभिनय कौशल्य दाखवता आलं नाही, की त्यातील रोमान्स चांगल्याप्रकारे दाखवता आला. त्यामुळे श्रद्धा कपूरने हा सिनेमा केला नसता तर सिनेमा बॉक्स ऑफिसवर आदळला नसता.
काय प्लस?
श्रद्धाच्या अभिमयाची कसर आदित्य रॉय कपूर त्या मानाने चांगली भरून काढतो. आदित्य रॉय कपूरने सिनेमात खरेपणा टिकून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. तसेच सहाय्यक अभिनेता शाद रांधवा हा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. महेश भट्ट राहुलचे अदृश्य वडील म्हणून चित्रपटात दिसतात ज्यांच्या कामालाही उत्तम दाद मिळत आहे.
तर मित्रांनो तुम्ही सिनेमा खालील फक्त तीनच कारणासाठी पाहायला जा
१. आदित्य रॉय कपूरसाठी
२. सिनेमातील गाण्यांसाठी
३. जिज्ञासेपाटी
नाही तर पैस आथवा वेळ खर्ची करायला जाऊ नये.