फोटो : आयपीएलमध्ये किरॉन पोलार्डची अद्भूत कॅच!

सोमवारी, मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा जोरदार बॅटिंग आणि त्यानंतर धम्माल बॉलिंग करत राजस्थान रॉयल्सला त्यांच्या घरच्या मैदानावरच पछाडलं. सरदार पटेल स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये मुंबईनं राजस्थानला 25 रन्सनं मात दिली.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 20, 2014, 02:31 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जयपूर
सोमवारी, मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा जोरदार बॅटिंग आणि त्यानंतर धम्माल बॉलिंग करत राजस्थान रॉयल्सला त्यांच्या घरच्या मैदानावरच पछाडलं. सरदार पटेल स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये मुंबईनं राजस्थानला 25 रन्सनं मात दिली.
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स दरम्यान झालेल्या या रोमांचक मॅचमध्ये एक अद्भूत म्हणावी अशी कॅच पाहायची संधी प्रेक्षकांना लाभली... ही संधी दिली मुंबई इंडियन्सचा खेळाडू किरॉन पोलार्डनं...
आठव्या ओव्हरमध्ये चौथ्या बॉलवर हरभजन सिंहनं केविन कूपरसाठी बॉलिंग करताना बॉल टाकला. कूपरनं बॉलला जोरदार टोलावत सिक्सर मारण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचं दुर्भाग्य... कारण, बाऊंड्री लाईनवर किरॉन पोलार्ड उभा होता...

कशी पकडली पोलार्डनं ही कॅच...
कूपरनं बॉलला टोलावल्यनंतर बॉल बाऊंड्रीच्या बाहेर जाणार तितक्यात किरॉन पोलार्डनं उडी मारून आपल्या हातात पकडला... या दरम्यान पोलार्डनं तोलही थोडा डळमळला आणि तो बाऊंड्रीच्या बाहेर गेला... पण, प्रसंगावधान राखून बाऊंड्रीच्या बाहेर जाण्याअगोदरच पोलार्डनं आपल्या हातातील बॉल मैदानात उंच फेकला.... बाऊंड्रीच्या बाहेर गेलेल्या पोलार्डला बॉल पकडता येणार नाही असं वाटलं तेव्हा त्यानं पुन्हा मैदानात येऊन समोरचा बॉल हवेत एक स्ट्राईक मारून पकडला... आणि बॉल पुन्हा एकदा पोलार्डच्या हातात आला.
ही असंभव कॅच पकडून पोलार्डन हैदराबादला चौथा झटका दिला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.