www.24taas.com, झी मीडिया, पर्थ
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जॉर्ज बेली याने इंग्लड विरुद्ध तिसऱ्या टेस्टमध्ये एका ओव्हरमध्ये सर्वाधिक रन्स बनवून महान फलंदाज ब्रायन लाराच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
वेस्ट इंडिजचा महान फलंदाज लारा याने २००३मध्ये जोहान्सबर्ग येथे द. आफ्रिकेविरुद्ध रॉबिन पीटरसन यांच्या एका ओव्हरमध्ये २८ रन्स काढले होते.
बेली याने तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाज जिमी एंडरसन यांच्या एका ओव्हरमध्ये २८ रन्स कुटले.
आपल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात जॉर्ज बेली याने हा कारनामा केला आहे. या ओव्हरमध्ये बेली याने तीन षटकार आणि दोन चौकार लगावले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क याने दुसरा डाव ६ बाद ३६९ वर घोषित केला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.