मॉडेलच्या ड्रेसचे तुकडे तुकडे होवून ड्रेस कोसळला

एका मॉडेलच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा क्षण म्हणजे तिचे कपडे, तिचं रॅम्पवॉक, पण जर हाच क्षण अवघड होतो जेव्हा हाच रॅम्पवॉक करताना तिच्या अंगावरचे कपडे खाली कोसळतात आणि सगळ्यांमध्ये त्या मॉडेलची भरभरून चर्चा होते.

Updated: Dec 7, 2014, 05:22 PM IST
मॉडेलच्या ड्रेसचे तुकडे तुकडे होवून ड्रेस कोसळला title=

नवी दिल्ली : एका मॉडेलच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा क्षण म्हणजे तिचे कपडे, तिचं रॅम्पवॉक, पण जर हाच क्षण अवघड होतो जेव्हा हाच रॅम्पवॉक करताना तिच्या अंगावरचे कपडे खाली कोसळतात आणि सगळ्यांमध्ये त्या मॉडेलची भरभरून चर्चा होते.

असे चित्रविचित्र प्रयोग सगळीकडेच चालु असतात. असाच एक चित्रविचित्र प्रयोग फ्रान्समध्ये घडला. फ्रांसच्या एका टिव्ही चॅनलच्या अॅंकरनं असाच प्रयोग केला आणि ती फसली. या बाईनं खास चॉकलेटच्या सहाय्यानं ड्रेस घालून रॅम्पवॉक करण्याचं ठरवलं आणि अर्धा रॅम्पही चालत नाही तोवर त्या चॉकलेटचे तुकडे कडकड करत तुटू लागले.

त्या चॉकलेटचा एक-एक तुकडा सांभाळत तिनं सावरण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी काय चॉकलेटच ते गुणधर्माप्रमाणे विरघळणारच. सुरूवातीला फेरी नावाच्या बाईनं हा चॉकलेट प्रयोग केला होता आणि तो देखील फसला. पण त्या मॉडेलनं त्याखाली स्कर्ट घालण्यातच शहाणपण दाखवलं होतं त्यामुळं चॉकलेट गेलं तर तिची लाज वाचली असं म्हणायला हरकत नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.