ठाणेकरांच्या मालमत्ता कराची (property tax) आकारणी यापुढे भांडवली मूल्यावर (capital value) आधारित असावी, असा प्रयत्न महापालिकेने सुरू केला आहे. ही नवी प्रणाली अमलात आणण्यापूर्वी शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकाला स्वतःचा मालमत्ता कर स्वतःच ठरविता येईल, अशी योजनाही महापालिकेने आखली आहे.
यासाठी स्वयंमूल्य निर्धारण विवरणपत्र भरून घेण्याची प्रकिया येत्या ३१ मेपर्यंत राबविली जाणार आहे. ही नवी प्रणाली कशी असेल? विवरणपत्र भरताना कोणती काळजी घ्यावी, त्यासाठी आवश्यक माहिती कोठे मिळेल, रेडी रेकनरचे दर, घरांचे क्षेत्रफळ कसे मोजावे, अशा अनेक शंकांनी सध्या ठाणेकरांना भंडावून सोडले आहेत.
तुम्हांलाही असे प्रश्न पडले असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या प्रश्नांना उत्तर थेट ठाणे महापालिका आयुक्त आर. ए. राजीव उत्तर देतील. तर काय आहे, तुमचे प्रश्न आम्हांला कळवा....
खाली प्रतिक्रियांच्या बॉक्समध्ये आपण आपली शंका विचारू शकतात. यातील बहुतांशी शंकाचे निरसन करण्याचे काम आम्ही करू......