Rishabh Shetty Upcoming Film Chhatrapati Shivaji Maharaj : 'कांतारा' या चित्रपटामुळे प्रकाश झोतात आलेला दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टी हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ऋषभ शेट्टीनं त्याच्या आगामी चित्रपटाची नुकतीच घोषणा केली आहे. या आगामी चित्रपटात त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यानं त्याच्या लूकची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ऋषभ शेट्टीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टरची चांगलीच चर्चा सुरु आहे.
ऋषभ शेट्टीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टची माहिती दिली आहे. ज्यानंतर त्याचे चाहते हे उत्साही झाले आहेत. तर हा चित्रपट 2027 मध्ये प्रदर्शित झाला. ऋषभनं ही पोस्ट शेअर करत त्यात लिहिलं की 'हा फक्त एक चित्रपट नसून, समाजातील वाईट प्रवृत्तींशी लढणाऱ्या एका योद्ध्याची कहाणी आहे. ज्यानं मुघल साम्राज्याला आव्हान दिलं आणि या अशा योद्ध्याचं कर्तृत्त्वं, वारसा कधीही विस्मरणात जाणार नाही. एका भव्यदिव्य कलाकृतीसाठी आणि चित्रपटाच्या न भूतो न भविष्यती अनुभवासाठी सज्ज व्हा!'
ऋषभ शेट्टीच्या या चित्रपटाला संदीप सिंग यांनी दिग्दर्शित केलं आहे. संदीप यांनी मेरी कॉम, सरबजीत, वीर सावरकर, रामलीला, सरबजीत सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता तो ऋषभ शेट्टीसोबत काम करत आहे. ऋषभ देखील या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात चाहत्यांना जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : विक्रांत मेसीनं Retirement का घेतली? खरं कारण अखेर समोर
कांतारानंतर ऋषभ शेट्टीच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. आता तो कांताराचा सीक्वल कांतारा चॅप्टर 1 ला घेऊन चर्चेत आहे. हा चित्रपट ऑक्टोबर 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर 2026 मध्ये ऋषभ शेट्टीचा जय हनुमान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर 2027 मध्ये छत्रपति शिवाजी महाराज. पुढच्या तीन वर्षात ऋषभ शेट्टीचे एकामागे एक चित्रपट पाहायला मिळणार आहे.