एडसवर औषध मिळालं, आता निर्धास्त व्हा....

३० वर्षाच्या अथक परिश्रमानंतर अमेरिकेने एडसवरील औषध 'त्रुवदा' याला मान्यता दिली आहे. हे औषध एडसपासून बचाव करते. म्हणजेच एडसचे संक्रमण होण्यापासून बचाव करते.

Updated: Jul 17, 2012, 12:14 PM IST

www.24taas.com, वाशिंग्टन

 

३० वर्षाच्या अथक परिश्रमानंतर अमेरिकेने एडसवरील औषध 'त्रुवदा' याला मान्यता दिली आहे. हे औषध एडसपासून बचाव करते. म्हणजेच एडसचे संक्रमण होण्यापासून बचाव करते. एडस कोणत्याही स्थितीत पोहचला असला तरी या औषधाचा वापर करता येणार आहे. अमेरिकेच्या खाद्य आणि औषध प्रशासनाने या औषधाला मान्यता दिली आहे.

 

बाजारात विकल्या जाणाऱ्या एडससाठी बनविण्यात आलेली त्रुवदा हे पहिले औषध आहे जे एडस संक्रमण पासून रक्षा करण्यासाठी पूर्णपणे उपयोगी आहे. हे औषध तेव्हा उपयोगी आहे जेव्हा व्यक्तीला एडस होण्याचा धोका असतो. तसचं याचा वापर असुरक्षित संभोग केल्यानंतर एडस होण्याची शक्यता असल्यास केला जाऊ शकतो. त्रुवदा हे औषध आहे की ते अशा लोकांनांही दिले जाऊ शकते. ज्यांना एडसपासून बचाव करून घ्यायचा आहे. आणि ज्यांना एडस नाहीये त्यांना देखील औषधाचा वापर करता येणार आहे.

 

अमेरिकेने या औषधाला मंजुरी दिल्यानंतर एडसवर अंकुश आणणं सोपं जाणार आहे. गेल्या १५ वर्षात दरवर्षी ५० हजार एडसचे रुग्ण आढळून येतात. जियालेड साइंसेज इंक या औषधाचे मार्केटींग २००४ पासून करीत आहे. एडसपासून बचाव व्हावा यासाठी ह्या औषधाचा शोध लावण्यात आला होता. मात्र तब्बल ८ वर्षानंतर या औषधाला मान्यता मिळाली आहे.