इंडिया-ऑस्ट्रेलिया आज दुसरा टी-२० सामना

भारतीय क्रिकेट टीमचा दुसरा टी-२० सामना आज मेलबर्न येथे होणार आहे. या सामन्यात भारतीय टीम जिंकण्यासाठी प्रयत्न करेल. कसोटी मालिकेत पराभून झाल्यानंतरही पहिला टी-२० सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला होता.भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात तिरंगी मालिका होणार आहे. त्यामुळे भारताला आजच्या टी-२० सामन्यात चांगली कामगिरी करावी लागेल. हाच आत्मविश्वास टीम इंडियाला तिरंगी मालिकेसाठी लाभदायक ठरणारा असेल.

Updated: Feb 3, 2012, 10:21 AM IST

www.24taas.com, मेलबर्न

 

भारतीय क्रिकेट टीमचा दुसरा टी-२० सामना आज मेलबर्न येथे होणार आहे. या सामन्यात भारतीय टीम जिंकण्यासाठी प्रयत्न करेल. कसोटी मालिकेत पराभून झाल्यानंतरही पहिला टी-२० सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला होता. हा सामना दुपारी २ वाजता सुरू होईल.

 

१५ डिसेंबर २०११ पासून सुरू झालेल्या दौऱ्यात भारताला चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्यातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही आपले महाशतक पूर्ण करता आले नाही. सचिनने चाहत्यांची निराशा केली. तर कर्णधार महेंद्रसिंग धोनीही पराभवाचा धनी बनला आहे. तर दिग्गज् खेळाडूंनाही चमक दाखविता आली नाही. त्यामुळे हा ऑस्ट्रेलिया दौरा टीम इंडिला कठीण गेला आहे.

 

या दौऱ्याचा शेवट गोड करण्यासाठी आजचा दुसरा टी-२० सामना भारताला जिंकावा लागेल. पहिल्या सामन्यात ३१ रन्सने पराभव झाला होता. तर ऑस्ट्रेलियात तिन संघात वन-डे सिरीज ५ फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात तिरंगी मालिका होणार आहे. त्यामुळे भारताला आजच्या टी-२० सामन्यात चांगली कामगिरी करावी लागेल. हाच आत्मविश्वास टीम इंडियाला तिरंगी मालिकेसाठी लाभदायक ठरणारा असेल.

 

कशी असेल टीम

 

भारत : वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, प्रवीणकुमार, विनयकुमार, राहुल शर्मा, इरफान पठाण.

 

ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू वेड (यष्टिरक्षक), ट्रेविस बर्ट, डेव्हिड हसी, जॉर्ज बेली (कर्णधार), अ‍ॅरोन फिंच, एम. मार्श, डॅनियल क्रिस्टियन, ब्रेड हॉज, ब्रेट ली, क्लिंट मॅके, डोहर्ती.