www.24taas.com, लंडन
लंडन ऑलिम्पिक हे भारतीयांसाठी आत्तापर्यंतचं सर्वात महत्त्वाचं ऑलिम्पिक आहे. यंदा भारताचे तब्बल ८३ खेळाडू देशाला मेडल मिळवण्यास झुंज देताना दिसतील. यासाठी भारतीय खेळाडू जी-तोड प्रयत्न करतायत. लंडनच्या ऑलिम्पिक पार्कवर या खेळाडूंची परेड दिली. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय दलाचं नेतृत्व केलं कुस्तीपटू सुशील कुमारनं... सुशीलनं बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताला ब्राँझ पदकाची कमाई करुन दिली होती. या ८३ खेळाडूंवरच एक अब्जाहूनही अधिक भारतीयांच्या आशा आहेत. भारतीयांच्या अपेक्षा आपल्या खांद्यावर घेऊन हे वीर आपलं आणि सर्व भारतीयांच स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूनं आपल्या लक्ष्याकडे वाटचाल करतायत.
ऑलिम्पिकमध्ये तिंरदाजांवर आज संपूर्ण भारतीयांच्या नजरा असणार आहेत. त्यानंतर बॉक्सिंगमध्ये विजेंदर सिंग आणि शिवा थापाही आपली दावेदारी प्रस्थापित करतील. शूटिंगममध्ये विजय कुमार १० मीटर एअर पिस्तूलमध्ये लढणाताना दिसेल. तर टेनिस महिला डबल्समध्ये सानिया मिर्झा आणि रुश्मी चक्रवर्तीही आपली सलामीची मॅच खेळणार आहेत. तर बडमिंटनमध्ये ज्वाला गुट्टासाठी आज महत्त्वाचा दिवस असेल. वुमेन्स डबल्स आणि मिक्स डबल्स मध्ये तिचा मुकाबला असणार आहे.
ऑलिम्पिकमध्ये आज भारत
बॅडमिंटन
* पी. कश्यप (मेन्स सिंगल्स)
* ज्वाला गुट्टा-अश्विनी पोनप्पा
* व्ही.दिजू - ज्वाला गुट्टा
तिरंदाजी (टीम इव्हेंट)
* जयंत तालुकदार, राहुल बॅनर्जी,
* तरुणदीप राय
रोईंग(मेन्स सिंगल्स स्कल्स)
* एस. सिंग
शूटिंग
* विजय कुमार (10 मी. एअर पिस्तल)
टेबल टेनिस
* अंकिता दास (वुमेन्स सिंगल्स)
* सौम्यजीत घोष (मेन्स सिंगल्स)
बॉक्सिंग
* विजेंदर सिंग (मिडलवेट -75 किलो)
* शिवा थापा (बँटामवेट - 56 किलो)
वेटलिफ्टिंग
* सोनिया चानू (48 किलो वजनीगट)
* टेनिस (वुमेन्स डबल्स)
* सानिया मिर्झा-रुश्मी चक्रवर्ती
.