शाळेतील घोटाळे संपता संपेना

शासकीय योजना आणि त्या योजनेत कुठलाही घोळ असणार नाही असं क्वचितच घडतं. राज्यातील सर्व शिक्षा अभियानांतर्गत जळगावमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष संपतानाही विद्यार्थी गणवेश वाटप सुरू असल्याचं उघड झालं आहे.

Updated: Jan 8, 2012, 05:37 PM IST

www.24taas.com, जळगाव

शासकीय योजना आणि त्या योजनेत कुठलाही घोळ असणार नाही असं क्वचितच घडतं. राज्यातील सर्व शिक्षा अभियानांतर्गत जळगावमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष संपतानाही विद्यार्थी गणवेश वाटप सुरू असल्याचं उघड झालं आहे.

विद्यार्थ्यांचा गणवेश तयार करायचं काम शैक्षणिक वर्ष संपत आलं तरीही सुरुच आहे. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश वाटप सुरु आहे. या योजनेत अनेक घोळ आहेत. शैक्षणिक सत्र संपायला येतं आहे मात्र,  अजूनही विद्यार्थ्यांना कापडच वाटलं जातं आहे.

शासनाच्या योजनेत अनेक घोळ झाले आहेत. त्यामुळे अधिकारीही डोळ्याला झापड लावूनच या योजनेची अंमलबजावणी करत आहेत. या योजनेवर काही उर्दू शाळांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे ही योजना अडचणीत सापडली आहे. एकूणच शासकीय योजनांमधील होणारा गोंधळ यामुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.