कोकण पदवीधरमध्ये तिरंगी लढत

कोकण पदवीधर निवडणुकीचं केंद्र आता ठाणे शहर बनलय. भाजपचे संजय केळकर विरुद्ध राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे अशी ही लढत अपेक्षित होती.. मात्र राष्ट्रवादीच्या नीलेश चव्हाण यांची बंडखोरी आणि त्यांना मनसेनं दिलेला पाठिंबा, यामुळं आता ही लढत तिरंगी ठरणार आहे.

Updated: Jul 1, 2012, 04:29 PM IST

www.24taas.com, ठाणे

 

कोकण पदवीधर निवडणुकीचं केंद्र आता ठाणे शहर बनलय. भाजपचे संजय केळकर विरुद्ध राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे अशी ही लढत अपेक्षित होती.. मात्र राष्ट्रवादीच्या नीलेश चव्हाण यांची बंडखोरी आणि त्यांना मनसेनं दिलेला पाठिंबा, यामुळं आता ही लढत तिरंगी ठरणार आहे.

 

कोकण पदवीधर निवडणुकीची चुरस शिगेला पोहचलीय. भाजपच्या संजय केळकर यांच्याकडे असलेली ही जागा मिळवण्यासाठी यावेळी राष्ट्रवादीने जोर लावलाय. मात्र कार्यकाळात केलेली कामे, महायुतीचा संपर्क आणि घराणेशाहीविरोधतला प्रचार यामुळे सहज विजय मिळवता येईल, असा विश्वास भाजपला आहे.

 

राष्ट्रवादीच्या निरजंन डावखरेंनीही जोर लावलाय.. वसंत डावखरे यांचं राजकीय वजन, अनेक शिक्षक संघटनांचा पाठिंबा आणि आघाडीचे बळ यामुळे विजयाचे प्रबळ दावेदार असल्याचं निरंजन डावखरेंचं म्हणणय. तर डाखरेंच्या घराणेशाहीविरोधात राष्ट्रवादीचे नेते निलेश चव्हाण या निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. राज ठाकरेंच्या मनसेनंही चव्हाणांना पाठिंबा जाहीर केलाय.. त्यामुळे चव्हाणांचा आत्मविश्वास दुणावला आहे. येत्या काळात मनसेसोबत काम करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केलीय.

 

नीलेश चव्हाणांना मनसेचा पाठिंबा मिळाल्यानं त्यांचं पारड जड झालंय, याचा नक्की फटका निरंजन डावखरेंना किती बसणार याची उत्सुकता आहे..तर महायुती केळकरांना मदत करणार का, की वसंत डावखरेंची शिवसेनेशी असलेली दोस्ती निरंजन डावखरेंच्या पथ्यावर पडणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मतमोजणीच्या दिवशीच मिळतील.

 

व्हिडिओ पाहा..

[jwplayer mediaid="130969"]