मुंबई : ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे, अंधेरी पोटनिवडणूकीसाठी (Andheri Bypoll Election) शिवसेनेचं चिन्ह गोठवण्यात आलं आहे. आता अंधेरी पोटनिवडणूकीमध्ये शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हावर लढवता येणार नाही. अशातच एक मोठी बातमी समोर येतेय.
उद्धव ठाकरेंनी आयोगासमोर तीन निवडणूक चिन्हांचे पर्याय दिलेत. त्याचसोबत पक्षाच्या नावाचेही तीन पर्याय उद्धव ठाकरे यांनी आयोगासमोर ठेवलेत. उद्धव ठाकरेंनी अशा तीन चिन्हांचा पर्याय आयोगासमोर ठेवल्याची माहिती झी २४ तासच्या हाती आलीय.
उद्धव ठाकरेंनी संभावित तीन चिन्ह आणि नावाचे पर्याय निवडणूक आयोगासमोर दिले आहेत. यामध्ये-
1) त्रिशूळ
2) उगवता सूर्य
3) मशाल
शनिवारी निवडणूक आयोगाने 4 तासांच्या बैठकीनंतर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला होता. तसxच शिवसेना हे पक्षाचे नाव वापरण्यासही दोन्ही गटांना मनाई करण्यात आली होती. त्यामुळे आता दोन्ही गटांना नव्या नावाची आणि नव्या निवडणूक चिन्हाची निवड करावी लागणार होती.
10 ऑक्टोबरला नवीन नाव आणि चिन्हांचे तीन पर्याय सादर करण्याचा आदेश आयोगाने दिले होते. यानंतर आता शिवसेनेने नाव आणि चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगासमोर दिले आहेत