मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Tahckarey ) यांनी जोपर्यंत भोंगे उतरत नाहीत तोपर्यत हा लढा कायम सुरू राहणार आहे. त्याची अंमलबजावणी मनसैनिक करणार आहेत. मंदिरात घंटा वाजवायला बंदी घातली असेल तर त्याचा निषेध करतो. पण, असे होत असेल तर आम्ही पुन्हा महाआरती सुरू करणार, असा इशारा मनसे प्रवक्ते गजानन काळे ( MNS Gajanan Kale ) यांनी दिला आहे.
राज ठाकरे ( Raj Thackaraey ) यांनी जी भूमिका घेतली त्यानंतर महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी अयोध्या दौरा करायला सुरुवात केली. हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa ) वाचली. आता तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) हे ही अयोध्या दौऱ्याला जाणार अस कळतंय हे असं इतिहासात पहिल्यांदा होतंय, असा टोला त्यांनी लगावला.
महाविकास आघाडी सरकार म्हणते की कायदा सर्वांना सारखा आहे. शिवसेनेची ( Shivsena ) टोमणे सभा 14 तारखेला होत आहे. संभाजीनगरच्या ( Sambhaji Nagar ) राज ठाकरेंच्या सभेला ज्या 16 जाचक अटी घातल्या तशाच अटी शिवसेनेच्या सभेला घातल्या जाणार का? जो न्याय राज ठाकरे यांच्या सभेला लावण्यात आला तोच न्याय इथेही देणार का? असा सवाल काळे यांनी केला.
शिवसेनेने 14 तारखेच्या सभेचा टीजर रिलीज केला. पण, त्यात मनसेच्या सभेची दृश्य लावण्यात आली. शिवसेना आता चोरसेना ( Chor Sena ) झाली आहे. नगरसेवक चोरता चोरता आता गर्दी करण्यासाठी मनसेचे फोटो, व्हिडिओ ही चोरू लागले आहेत, अशी खरमरीत टीकाही गजानन काळे यांनी केलीय.