राज्य सरकारने इंधन करकपातीची घोषणा केली खरी, पण...

मोदी सरकारनंतर (Central Government) ठाकरे सरकारने (Maharashtra Government) इंधन करकपातीची घोषणा केली...

Updated: May 23, 2022, 01:43 PM IST
राज्य सरकारने इंधन करकपातीची घोषणा केली खरी, पण...  title=

मुंबई : पेट्रोल-डिझेल स्वस्त झालं म्हणून पंपावर भरायला गेलेल्या वाहनचालकांचा हिरमोड होऊ शकतो. कारण राज्यात पेट्रोल डिझेलचे दर अजूनतरी जैसे थेच आहेत. राज्याकडून पेट्रोल, डिझेल स्वस्त कधी मिळणार असा सवाल केला जातोय. राज्य सरकारने काल पेट्रोल आणि डिझेलवर करकपातीची घोषणा केली खरी, पण करकपातीची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.

त्यामुळे राज्य सरकारची इंधन करकपातीची घोषणा हवेतच विरली का असा प्रश्न विचारला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी काल घोषणा करूनही अजून करकपातीची अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे राज्यात पेट्रोल डिझेल दर जैसे थेच आहेत.

पेट्रोल-डिझेलवरची करकपात कमी
मोदी सरकारनंतर (Central Government) ठाकरे सरकारनेही (Maharashtra Government) मुल्यवर्धित करात (Vat) घट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इंधनाच्या दरात घट झाली आहे. राज्य सरकारने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.  (maharashtra government has reduced vat on petrol and diesel from today)  

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे  पेट्रोल 2 रुपये 8 पैसे आणि डीझेलच्या दरात 1 रुपया 44 पैशांनी घट होणार आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक 2 हजार 500 कोटींचा भार पडणार आहे.

केंद्र सरकारने इंधनाच्या दरात कपात केल्यानंतर राज्य सरकारवर इंधनाच्या दरात कपात करण्याचा दबाव वाढला होता. तसंच राज्य सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. त्यानंतर राज्य सरकारने व्हॅट कमी केल्याची घोषणा केली. पण राज्यात अजून तरी पेट्रोल-डिझेलचे दर कमी झालेले नाहीत.