मुंबई : दिवसागणित इंधन दरवाढ होत आहे. महागाईत वाढ होत आहे. त्यामुळे इंधन दरवाढीविरोधात लालबागमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी रास्तारोको केला. केंद्र सरकारला जागे करण्यासाठी इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचे हे आंदोलन (Shiv Sena agitation) आहे, असे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन । केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी । आंदोलनामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी । दादर टीटी सर्कल इथे शिवसेनेचे रस्तारोको आंदोलन#ShivSena @ShivSenahttps://t.co/Ct4fYeN6GF pic.twitter.com/Ab4mE0DzXQ
— ZEE २४ तास (@zee24taasnews) December 10, 2020
शिवसेना दक्षिण मुंबई विभाग ११ च्या वतीने महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले. घरगुती गॅस , पेट्रोल आणि डिझेल दरवाढ विरोधात शिवसेनेने एल्गार केला. यावेळी केंद्र सरकारविरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
शिवसेना दक्षिण मुंबई विभाग ११ च्या वतीने महागाई विरोधात आंदोलन.
(घरगुती गॅस , पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात एल्गार)@AUThackeray pic.twitter.com/60qjguS9TD— Kishori Pednekar (@KishoriPednekar) December 10, 2020
पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे. याकडे सरकार लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी केंद्र सराकर विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.