Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. आज वर्षावर शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांची बैठक झाली. या बैठकीत 15 आमदार उपस्थित होते. तर 3 आमदार मतदार संघातून होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत (CM Uddhav Thackeray) आता 18 आमदार सोबत आहेत. तर मुंबईत आल्यानंतर 21 आमदार आमच्यासोबत येतील असा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय. तसंच अविश्वास ठराव मांडल्यास बहुमत सिद्ध करणार असंही राऊत म्हणाले...
बंडखोर आमदारांना अल्टिमेटम
शिवसेना मविआतून बाहेर पडण्यास तायर आहे. मात्र बंडखोर आमदारांनी मुंबईत येवून ही इच्छा व्यक्त करावी असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ठाकरे समर्थक आमदारांसोबत घेतलेल्या पत्रकार परिषद केलं आहे.
त्या आमदारांनी महाराष्ट्रात यावं, मुंबईत यावं. त्यांची जी मागणी आहे, ती अधिकृतपणे शिवसेना पक्षप्रमुखांसमोर मांडावी. त्यांच्या मागणीचा नक्की विचार होईल. पण त्यांनी आधी मुंबई येण्याची हिम्मत दाखवावी. तिथे बसून तुम्ही पत्रव्यवहार करू नका. आपण पक्के शिवसैनिक आहात, आपण शिवसेना सोडणार नसल्याचं सांगताहेत. आमची भूमिका सध्याच्या सरकारबाबत आहे. त्या महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडायला तयार आहे. तुम्ही इथे येण्याची हिम्मत दाखवा. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोर या आणि भूमिका मांडा. नक्कीच तुमच्या भूमिकेचा विचार होईल. 24 तासात परत या.", असंही संजय राऊत यांनी पुढे सांगितलं.
शिंदे गटातल्या 21 आमदारांचा आमच्याशी संपर्क झाला आहे. कुणी किती व्हिडीओ पाठवले तरी ज्या दिवशी ते मुंबईत येतील तेव्हा ते शिवसेनेचे असतील. या सर्वांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं आहे. बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली तर आम्ही विजयी होऊ.", असंही संजय राऊत यांनी पुढे सांगितलं.