मुंबई : शिवसेना खासदार राहुल शेवाळेंविरोधात (Rahul Shewale) एका महिलेनं बलात्काराची तक्रार दिली आहे. साकीनाका पोलिसांमध्ये (Sakinaka Police) ही लेखी तक्रार देण्यात आलीय. शेवाळे यांनी ही तक्रार निराधार असून आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी हेतुपुरस्सर करण्यात आल्याचं म्हटलंय. आपला मुंबई पोलीस आणि कायद्यावर विश्वास असून कोणत्याही चौकसीला तयार असल्याचं शेवाळेंनी निवेदनाद्वारे स्पष्ट केलंय. या तक्रारीमागे हात असलेल्यांचा पर्दाफाश करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. (shiv sena mp rahul shewale accused of rape woman lodges written complaint in police)
"एका महिलेकडून मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात माझ्या विरोधात लेखी तक्रार करण्यात आली आहे. ही करण्यात आलेली लेखी तक्रार ही पूर्णतः निराधार आहे. माझी सामाजिक-राजकीय क्षेत्रातील माझी प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने हा सर्व प्रकार केला आहे", अशी प्रतिक्रिया खासदार शेवाळे यांनी दिली.
"माझा मुंबई पोलीस आणि कायद्यावर पुर्णतः विश्वास असून याबाबत पोलीस आणि न्याययंत्रणा योग्य निर्णय घेईल, असा मला विश्वास आहे. मी निर्दोष असल्याचं सिध्द करण्यासाठी कोणत्याही चौकशीसाठी तयार आहे. तसेच या तक्रारीमागे असणाऱ्या लोकांचाही पर्दाफाश लवकरच करेन", असंही शेवाळे यांनी स्पष्ट केलं.