मुंबई : Petrol-Diesel Price : देशभरात एक दिवस पेट्रोलचा दर थांबल्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज 19 पैशांनी वाढ झाली आहे. ज्यानंतर राजधानी दिल्लीत एक लीटर पेट्रोलची किंमत आता 95.56 रुपये आहे. (Petrol-Diesel Price Today : Petrol-Diesel Price Increased by 19 paise per litre) हा आतापर्यंतचा दिल्लीतील सर्वाधिक दर आहे. एक लीटर डिझेलकरता 86.47 रुपये आकारावे लागणार आहे. यावर्षी 4 मे नंतर आतापर्यंत 22 वेळा पेट्रोल आणि डिझेल महागलं आहे.
देशातील वेगवेगळ्या भागात पेट्रोलने ऐतिहासिक उंची गाठली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि लडाखसह सहा राज्यात आणि केंद्र शासित प्रदेशात 100 रुपये प्रती लीटर पेट्रोल झाले आहे. तेथेच मुंबईत पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली असून आताचा दर 101 रुपये आहे.
देशात राजस्थानमध्ये पेट्रोल आणि डिझेलकरता सर्वाधिक वॅट आकारला जातो. यानंतर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगान यांचा नंबर येतो. मुंबई देशातील पहिलं महानगर आहे जेथे 29 मे रोजी पेट्रोलचा दर हा 100 रुपये प्रती लीटरवर पोहोचला आहे. मुंबईत यावेळी पेट्रोलचा दर हा 101.71 रुपये आणि डिझेल 93.77 रुपये प्रती लीटर आहे.
यावर्षी चार मेनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 22 वेळा वाढ झाली आहे. या दरम्यान पेट्रोलचे दर 5.15 रुपये आणि डिझेव 5.74 रुपये प्रती लीटरने वाढलं आहे. तेल कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या 15 दिवसांत दर वाढले आहे.