पंकजा मुंडे, विनोद तावडे, शिवेंद्रराजेंनी वाहिली बाळासाहेबांना आदरांजली

भाजप नेत्यांची बाळासाहेबांना शिवतिर्थावर आदरांजली

Updated: Nov 17, 2019, 01:38 PM IST
पंकजा मुंडे, विनोद तावडे, शिवेंद्रराजेंनी वाहिली बाळासाहेबांना आदरांजली title=

मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आज हजारो शिवसैनिकांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. सकाळपासूनच शिवतिर्थावर शिवसैनिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. फक्त शिवसैनिकच नाही तर इतर पक्षाचे नेते देखील बाळासाहेबांनी आदरांजली वाहण्यासाठी शिवाजी पार्कवर पोहोचत आहेत. भाजपचे नेते विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.

भाजप नेते शिवाजी पार्कवर येणार का अशी चर्चा होती. पण सर्वात आधी या तिन्ही नेत्यांनी हजेरी लावली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील शिवाजी पार्कवर पोहचणार आहे.

बाळासाहेबांना स्मृतीस्थळाच्या दर्शनासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कवर दाखल होत आहेत. शिवसेना नेते मनोहर जोशी, दीपक केसरकर आणि नीलम गोऱ्हे यांनी देखील स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. वाद ज्यांनी सुरू केला त्यांनी मिटवावा अशी प्रतिक्रिया यावेळी मनोहर जोशींनी दिली आहे. तसंच भाजपसोबतचा वाद मिटला नाही तरी शिवसेनेकडे बहुमत आहे आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

 

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेब ठाकरेंना कोणकोणते नेते आदरांजली वाहणार याची चर्चा सुरु आहे. महाशिवआघाडी स्मृतीस्थळावर दिसणार का? याची उत्सुकता आहे. त्याहीपेक्षा भाजप नेते स्मृतीस्थळावर जाऊन आदरांजली वाहणार का? याची जोरदार चर्चा आहे.