नीरव मोदीच्या मालकीच्या ९ ठिकाणी छापे

 नीरव मोदीच्या सर्व कार्यालयं आणि दुकानांवर धाडी पडल्या आहेत. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 15, 2018, 02:07 PM IST
नीरव मोदीच्या मालकीच्या ९ ठिकाणी छापे title=

मुंबई : नीरव मोदीच्या सर्व कार्यालयं आणि दुकानांवर धाडी पडल्या आहेत. मुंबईतल्या घरीही ईडीचा छापा पडला आहे. नीरव मोदीच्या मालकीच्या 9 ठिकाणी ईडीचे छापे पडले आहेत. मुंबईतल्या 4 दिल्लीतल्या 2 आणि सुरुतमध्ये 3 ठिकाणी ही कारवाई करण्यात आलीय.

11 हजार 500 कोटींचा अपहार 

पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील फोर्ट शाखेतून 11 हजार 500 कोटींचा अपहार उघड झालाय. याप्रकरणी सीबीआयनं बडा हिरा व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्यासह सहा जणांविरोधात एफआयआर दाखल केलीय. या प्रकरणी आतापर्यंत पंजाब नॅशनल बँकेच्या 10 कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलंय. 

सेबी आणि बीएसईला माहिती

या अपहार उघड झाल्यावर पंजाब नॅशनल बँकेनं सेबी आणि मुंबई शेअर बाजाराच्या अधिकाऱ्यांना बुधवारी लेखी पत्राद्वारे माहिती कळवलीय. झालेल्या अपहारानंतर पंजाब नॅशनल बँकेनं देशातल्या सर्व बँकांनाही अशा अपहारांबद्दल सावधानतेचा इशारा दिलाय. 

पंजाब नॅशनल बँकेच्या शेअर्समध्ये मोठी पडझड 

अद्याप याप्रकरणी कुणालाही अटक झालेली नाही. घोटाळ्याच्या बातमीनंतर पंजाब नॅशनल बँकेच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झालीय. काल आणि आज मिळून  एकूण 18 टक्के घसरण झालीय.