मुंबई : Mumbai Metro Update :मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी. मेट्रोचे दोन नवीन मार्ग सुरु होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे. दोन मार्गांवरील मेट्रो (Mumbai Metro ) सुरु होणार असल्याने पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडीपासून मुंबईकरांची लवकरच सुटका होणार आहे. (Mumbai Metro - Andheri-East to Dahisar and Dahisar-DN Nagar Metro-2A route Starting soon )
मुंबई मेट्रोच्या रेड लाइन 7 अर्थात अंधेरी-पूर्व ते दहिसर आणि येलो लाइन 2 ए म्हणजे डीएनए नगर ते दहिसर या दोन मार्गिका डिसेंबरपूर्वी प्रवासी सेवेसाठी खुल्या केल्या जाणारेत. सध्या या मेट्रो फे-यांची चाचणी सुरू आहे. या मेट्रो मार्गिकांमुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी गतिमान होणार आहे.
मेट्रो प्रवासाचा दुसरा टप्पा अखेर सुरु होण्याच्या मार्गावर आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) डहाणूकरवाडी ते आरे मेट्रो स्टेशनदरम्यान चाचणी घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थित हा सोहळा पार पडला होता. आता हा मार्ग डिसेंबरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.
डहाणूकरवाडी ते आरे मेट्रो स्टेशनदरम्यान मेट्रोची चाचणी प्रक्रिया विविध टप्प्यांत पार पडणार आहे. एकूण 20 किलोमीटरच्या मार्गावर या चाचण्या घेण्यात येणार आहेत. मेट्रो 2 अ (दहिसर पूर्व ते डी.एन.नगर) आणि मेट्रो 7 (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) या मार्गावरील मेट्रो दोन टप्प्यात धावणार आहे. डिसेंबरमध्ये पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार असून दुसरा टप्पा जानेवारी 2022 पर्यंत सुरू होईल, अशी शक्यता आहे.