मुंबई : Mumbai Local Trains: मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी. ( mega block news) मध्य रेल्वेवर ठाणे-दिवा आणि हार्बरवर पनवेल-वाशी मार्गावर रविवारी मेगाब्लॉक (mega block) घेण्यात येणार आहे. याबाबत मध्य रेल्वेने ब्लॉकबाबतची घोषणा केली आहे. (Sunday mega block news) तर पश्चिम रेल्वेकडून माहीम-मुंबई सेंट्रल दरम्यान शनिवार-रविवारी मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत पर्यायी मार्गावरून लोकल धावणार आहेत. दरम्यान, पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्री जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. ट्रॅक, सिग्नल यंत्रणा दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच माहीम ते मुंबई सेंट्रल स्लो लाईनवर जम्बो ब्लॉक असणार आहे.
पश्चिम रेल्वेवर 2 ते 3 ऑक्टोबर, 2021 दरम्यान मध्यरात्री माहीम आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान नाईट जम्बो ब्लॉक असणार आहे. ट्रॅक, सिग्नलिंग सिस्टीम आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी पश्चिम रेल्वेकडून शनिवार, 2 ऑक्टोबर आणि रविवार, 3 ऑक्टोबर, 2021 दरम्यान मध्यरात्री माहिम आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान 23.50 ते 04.50 तासांपर्यंत धीम्या मार्गावर अप राइट जम्बो ब्लॉक असेल.
ब्लॉक कालावधीत माहिम जंक्शन आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरील सर्व जलद मार्गावरील गाड्या वळवण्यात येतील. प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे या गाड्या माहीम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परेल आणि महालक्ष्मी स्थानकांवर थांबणार नाहीत. त्यामुळे, ब्लॉक कालावधी दरम्यान, प्रवाशांना मुंबई सेंट्रल आणि माहीम स्थानकांदरम्यान त्यांच्या गंतव्यस्थानाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल.
ठाणे ते दिवा मार्गावर अप आणि डाऊन धीमा दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 मेगाब्लॉग असणार आहे. ब्लॉक दरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप-डाऊन जलद मार्गावरून धावणार आहेत. यामुळे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत धावणाऱ्या सर्व लोकल गाड्या काहीशा विलंबाने धावणार आहेत.
पनवेल ते वाशी मार्गावर अप आणि डाऊन हार्बर सकाळी 111.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे सीएसएमटी ते पनवेल मार्गावरील अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. पनवेल-ठाणे तसेच नेरुळ-बेलापूर या मार्गावरील अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी सीएसएमटी-वाशी आणि ठाणे-वाशी मार्गावर विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
माहीम ते मुंबई सेंट्रल मार्गावर अप धीम्या मार्गावर ब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक रात्री 11.50 ते पहाटे 4.50 (शनिवार-रविवार मध्यरात्र) असणार आहे. त्यामुळे ब्लॉक दरम्यान अप धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.