मुंबईकरांचा रविवार मनस्तापाचा; मेगाब्लॉकच्या धर्तीवर पाहून घ्या लोकलचं वेळापत्रक

Mumbai Local Train : मुंबई हे शहर कधीच थांबत नाही, असं म्हणतात आणि शहरात धावणाऱ्या लोकल ट्रेनकडे पाहून याचाच अंदाज येतो.   

सायली पाटील | Updated: Oct 21, 2023, 08:19 AM IST
मुंबईकरांचा रविवार मनस्तापाचा; मेगाब्लॉकच्या धर्तीवर पाहून घ्या लोकलचं वेळापत्रक  title=
Mumbai local train megablock latest update

Mumbai Local Train : मुंबई शहरात सुट्टीच्या आणि त्यातही रविवारच्या दिवशी येणाऱ्यांची गर्दी इतकी मोठी असते की शहरात वाहतूक कोंडीची समस्या उदभवते. इतकंच काय तर, रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांचाही खोळंबा होतो. यामागचं पहिलं कारण असतं ते म्हणजे रेल्वेतील गर्दी आणि दुसरं कारण म्हणजे रविवारी रेल्वेच्या विविध मार्गांवर असणारा मेगाब्लॉक.  

22 ऑक्टोबर 2023 च्या रविवारीसुद्धा ही परिस्थिती उदभवू शकते. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गासाठी उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगाब्लॉकच्या धर्तीवर ठाणे-कल्याण मार्गिकेवर मध्यरात्री 1 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

रेल्वे वाहतुकीत कोणते बदल? 

रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळं अप आणि डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्यांचं वळण सहाव्या मार्गावरील अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण ते ठाण्यादरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. पाचव्या मार्गावरील डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे ते कल्याण दरम्यान अप जलद मार्गावरून वळवण्यात येतील आणि या गाड्या त्यांच्या निर्धारित स्थानकांवर 10 ते 15 मिनिटं उशिरानं पोहोचतील. 

हेसुद्धा वाचा : Weather Update : हिमाचल, उत्तराखंड, काश्मीर वगळता देशात विचित्र हवामान; पाहा नेमकी परिस्थिती काय 

 

हार्बर मार्गावरही मानखुर्द ते नेरुळ दरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी ते दुपारी 4 वाजून 15 मिनिटांपर्यंत  मेगाब्लॉक सुरु असणार आहे. या मेगाब्लॉकमुळं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी 11 वाजून 18 मिनिटांपासून दुपारी 3 वाजून 28 दरम्यान वाशी/बेलापूर/पनवेल दिशेनं  सुटणाऱ्या लोकलसेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशीहून सकाळी 10 वाजून 37 मिनिटांपासून दुपारी 3 वाजून 45 मिनिटांर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा/गोरेगाव दिशेनं सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

रेल्वेच्या या मेगाब्लॉकदरम्यान सीएसएमटी आणि मानखुर्ददरम्यान विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत. तर प्रवासी ट्रान्स हार्बर मार्गावरूनही प्रवास करु शकणार आहेत.