मुंबई : महाराष्ट्र सरकारने उद्योगपती आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. मुकेश अंबानी यांना गृह मंत्रालयाने झेड प्लस सुरक्षा दिली आहे. महाविकासआघाडी सरकारच्या काळात मुकेश अंबानी यांच्या (Antilia) घराबाहेर एका गाडीत विस्फोटक सापडले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात सचिन वाझेला अटक करण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत आता आणखी वाढ केली गेली आहे.
मुकेश अंबानी यांना देण्यात आलेली सुरक्षेचा सर्व खर्च मुकेश अंबानी हे स्वत: उचलतात. काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टात मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांची सुरक्षा काढण्याची याचिका दाखल करण्यात आली होती. पण तेव्हा देखील कोर्टाने मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्याचे आदेश दिले होते. मुकेश अंबानी यांचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश होतो.
देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांना केंद्र सरकारकडून Z+ सुरक्षा देण्यात आली आहे.
अंबानी कुटुंबाच्या Z+ सुरक्षेवर दर महिन्याला 20 लाखाहून अधिकचा खर्च केला जातो. पण Z+ सुरक्षेचा संपूर्ण खर्च मुकेश अंबानी हे स्वत: उचलतात. हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या धमक्यांमुळे अंबानींना 2013 मध्ये यूपीए सरकारने देखील Z+ सुरक्षा प्रदान केली होती.
झेड प्लस सुरक्षा व्यतिरिक्त मुकेश अंबानी यांनी वैयक्तिक सुरक्षा देखील घेतलीये. अंबानी यांच्यासोबत 20 वैयक्तिक सुरक्षा कर्मचारी असतात. जे पूर्णपणे प्रशिक्षित आहेत. या सुरक्षा रक्षकांना इस्रायलमधील सुरक्षा-कंपनीने प्रशिक्षण दिले आहे. या सुरक्षा रक्षकांमध्ये निवृत्त लष्कर आणि NSG जवानांचा समावेश आहे.