Dussehra 2022 : दसरा मेळाव्यासाठी (Dussehra 2022) ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटाकडून (Shinde Group) जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची दोन पोस्टर्स (Posters) जारी करण्यात आली आहेत. एका पोस्टरवर 'आम्ही विचारांचे वारसदार' तर दुसऱ्या पोस्टरवर 'हिंदवी तोफ पुन्हा धडाडणार' असा उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि आनंद दिघे (Anand Dighe) यांचा फोटो आहे. तर 'शिवसेनेचा दसरा मेळावा' असाही उल्लेख करत धनुष्यबाण चिन्ह छापण्यात आलंय. बीकेसी मैदानात शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे.
ठाकरे गटाकडून पोस्टर
दुसरीकडे ठाकरे गटाकडूनही दसरा मेळाव्यासाठी पोस्टर जारी करण्यात आलंय. 'काळ कसोटीचा आहे, पण काळाला सांगा हा वारसा संघर्षाचा आहे' अशा पद्धतीचं पोस्टर मातोश्रीच्या रिंगणात लावण्यात आलंय. 'वाजतगाजत गुलाल उधळत शिस्तीने या चला शिवतीर्थावर' असा एल्गार उद्धव ठाकरे यांनी केलाय.
दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाची तयारी
दसरा मेळाव्यासाठी (Dasara melava) शिंदे गटाकडून 7 हजार बस मुंबईत आणण्याची तयारी सुरु आहे. जवळपास 3 हजार एसटी बसेत तर 4 हजार खासगी बसेस मुंबईत आणायची तयारी सुरु आहे. अडीच ते तीन लाख शिवसैनिक मुंबईत दसरा मेळाव्यात येणार असल्याची चर्चा आहे. (Shinde group meeting for dasara melava)
एसटी महामंडळ, स्थानिक ट्रान्सपोर्ट, खासगी वाहने, पोलीस विभाग, ट्रॅफिक डिपार्टमेंट यांच्या नियोजना बाबत एक बैठकही घेण्यात आली. येणारी वाहने कशी आणायची, लांब पल्ल्याच्या गाड्या योग्य वेळेत दसरा मेळाव्यात कशा पोहोचतील यावर चर्चा झाली. मंत्री,आमदार आणि खासदार यांना जबाबदारीचे वाटप केले गेलं आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेनेत 2 गट पडले असून दोन्ही गटाकडून शिवसेनेवर दावा केला जात आहे. हा संघर्ष थेट सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला आहे. यावर सुनावणी देखील सुरु आहे. एकनाश शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर थेट एकनाथ शिंदे यांनाच भाजपकडून मुख्यमंत्री करण्यात आलं.