Lalbaghcha raja ganpati : सर्वांना आस लागलीये ती लाडक्या बाप्पाच्या आगमनाची... नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेला आणि जगप्रसिद्ध अशा 'लालबागच्या राजा'च्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक दरवर्षीच मोठी गर्दी करतात. एवढंच काय तर मोठमोठे सेलिब्रिटी देखील लालबागच्या राजाच्या दरबारात हजेरी लावतात. अशातच यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या राजाची पहिली झलक पाहायला आज पहायला मिळाली. मात्र, सर्वांच्या नजरा जमल्या होत्या लालबागच्या राजाच्या मुकूटावर... बिझनेसमन अनंत अंबानी यांची 'लालबागचा राजा'च्या कार्यकारी मंडळात मानद सदस्य म्हणून नियुक्ती झाल्यानंतर लालबागच्या राजाला सोन्याचा मुकुट अर्पण केलाय.
लालबागच्या राजाच्या चरणी मुकेश अंबानी यांच्याकडून 20 किलो सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आला आहे. या 20 किलो सोन्याच्या मुकुटाची किंमत तब्बल 16 कोटी रुपये इतकी आहे. आज लालबागच्या राजाचा प्रथमदर्शनी सोहळा पार पडला. यानिमित्त मुकेश अंबानी यांच्याकडून लालबागच्या राजाच्या चरणी मुकुट अर्पण केला आहे. लालबागचा राजाने आज परिधान केलेला सोन्याचा मुकुट हा अंबानी कुटुंबीयांकडून अर्पण केलेला आहे.
लालबागच्या राजाचं मुखदर्शन झालं की मुंबईत गणेशोत्सव सुरू होतोय, असं मानलं जातं. यंदा लालबाग राजाला काशी विश्वनाथ मंदिराची थीम ठेवण्यात आहे. लालबागच्या राजाचं यंदाचं हे 91 वं वर्ष आहे. अनंत अंबानी यांची 'लालबागचा राजा'च्या कार्यकारी मंडळात मानद सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर आता अनंत अंबानी यांनी तब्बल 16 कोटींचं मुकूट अर्पण केलं आहे. अनंत अंबानी यांच्या या दानशूरपणाची सध्या जोरदार चर्चा होताना दिसतीये.
दरम्यान, 1934 साली लालबागचा राजा मित्र मंडळाची स्थापना झाली होती. त्याकाळी कोळी समाजातील मच्छीमारांनी बाप्पाला नवस केला आणि बाप्पाने तो ऐकला यामुळेच या ठिकाणी बाप्पा विराजमान झाला, असं म्हटलं जातं. 1932 साली लालबाग मधील पेरू चाळ बाजारपेठ बंद करण्यात आली. यामुळे तिथल्या मच्छीमारांचं मोठं नुकसान झालं. यासाठी आम्हाला कायमस्वरूपी जागा मिळावी, असं म्हणत मच्छीमारांनी बाप्पाला नवस केला. त्यानंतर तो देखील पूर्ण झाला. कोळी बांधवांनी या ठिकाणी बाप्पाची मुर्ती बसवली. त्यानंतर लालबागचा राजा नवसाला पावतो, असं म्हणलं जाऊ लागलं.