Megablock : रविवारी दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा, मध्य- पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक

सोमवारपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. या अगोदरचा रविवार हा जर खरेदीसाठी ठेवला असेल तर ही बातमी जरुर वाचा. मुंबी लोकलचा रविवारी मध्य-पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 26, 2024, 08:14 AM IST
Megablock : रविवारी दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा, मध्य- पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक  title=

मध्य रेल्वे (CR) आणि पश्चिम रेल्वे (WR) रविवार, 27 ऑक्टोबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी त्यांच्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक आहे. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलच रविवारच मेगाब्लॉक शेड्युल नक्की पाहा.  पश्चिम मार्गावर, चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत पाच तास ब्लॉक असेल.

WR ने दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉक कालावधीत, चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सर्व अप आणि डाउन फास्ट मार्गावरील गाड्या स्लो मार्गांवर चालवल्या जातील. ब्लॉक दरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील तर काही चर्चगेट गाड्या वांद्रे/दादर स्थानकापूर्वी कमी कालावधीसाठी/उलटल्या जातील.

मुंबई लोकल ट्रेनच्या अपडेट्समध्ये, मध्य रेल्वेने सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी 10.25 ते दुपारी 2.45पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील, त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील आणि 15 मिनिटे उशिरी पोहोचतील. 

कसा असेल मेगाब्लॉक 

माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.05 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 2.45 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील, त्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील आणि नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.

पनवेल ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर (नेरुळ/बेलापूर-उरण बंदर मार्ग वगळून) सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत ब्लॉक राहील. सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत पनवेलहून सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी मुंबईहून सुटणाऱ्या पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत बंद राहतील.

सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत पनवेलहून सुटणारी ठाण्याच्या दिशेने जाणारी अप ट्रान्सहार्बर सेवा आणि पनवेलहून ठाण्याकडे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत बंद राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वाशी भागावर विशेष लोकल धावतील. तसेच, ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील आणि ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असतील.

"हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी होणाऱ्या गैरसोयीसाठी रेल्वे प्रशासनाकडे लक्ष द्यावे," असे CR प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे.