Dhananjay Munde : राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ होताना दिसत आहे. मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप असून त्यांनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
करुणा शर्मा या धनजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि 1,25,000 रुपयाचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले. करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या प्रथम पत्नी असल्याचा कोर्टाचा निर्वाळा असून, या प्रकरणात घरगुती हिंसाचार झाल्याचा दावा देखिल कोर्टानं मान्य केला आहे.
दरम्यान, हा निकाल आल्यानंतर करुणा शर्मा यांनी झी २४ तासला एक्सक्लूझिव्ह प्रतिक्रिया दिली. आपण 15 लाखांची मागणी केली होती मात्र 2 लाख दिल्यामुळे पुढच्या न्यायालयात जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं
पोटगीची रक्कम वाढवा...
'वकिलांनी एकही रुपया न घेता हा खटला लढला त्यासाठी मी त्यांचे आणि न्यायालयाचे आभार मानते. मी न्यायालयाच सर्व पुरावे सादर केले होते. न्यायालहानंही पहिली पत्नी म्हणून माझाच उल्लेख केला आहे. मी दर महिना 15 लाख रुपये मिळण्याची मागणी केली होती. पण, ती रक्कम मिळाली नाही. आता मी उच्च न्यायालयात धाव घेणार आहे', असं त्या म्हणाल्या.
1 लाख 70 हजार रुपये माझ्या घराचा हप्ता असून, महिना 30 हजार रुपये मेंटनन्स आहे. घरचा आणि मुलाबाळांचा खर्च मला आहे असं सांगत धनंजय मुंडेंसोबत असणाऱ्या वाल्मिक कराडकडे 4 हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे आणि आपल्या मुलांच्या नावावर मात्र 1 रुपयाची संपत्तीही नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. आपल्याकडे कोणताही व्यवसाय नाही असं सांगत याच कारणास्तव त्यांनी पोटगीची मागणी केली.