Mumbai Local Train Update: मुंबई व मुंबई उपनगरातील नागरिकांसाठी लोकल म्हणजे लाइफलाइन आहे. लोकलमुळं प्रवासांचं अंतर वाचते. तसंच, सुरक्षित प्रवासदेखील मानला जाता. 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभेसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने रात्रकालीन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कल्याण आणि पनवेल या धिम्या मार्गावर उशिरा या गाड्या सोडण्यात येणार आहे.
20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभेसाठी मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकारी, कर्मचारी हे उशिरापर्यंत कर्तव्यावर असतात. अशावेळी त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने उशिरापर्यंत गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 20 नोव्हेंबर रोजी पहाटे आणि मध्यरात्री उशिरा या गाड्या कल्याण आणि पनवेल या धिम्या मार्गावर धावणार आहेत. निवडणूक कर्तव्य बजावणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांनादेखील या सेवांचा फायदा होणार आहे.
मध्य रेल्वे 20 नोव्हेंबर रोजी विशेष लोकलचे वेळापत्रक लावणार आहे. पहाटे 3 वाजता डाउन मार्गावर सीएसएमटी-कल्याण, सीएसएमटी-पनवेल आणि अप मार्गावर कल्याण-सीएसएमटी, पनवेल-सीएसएमटी या मार्गावर धावणार आहेत.
सीएसएमटी-कल्याणः 1.10, 2.30
सीएसएमटी-पनवेलः 1.40, 2.50
कल्याण-सीएसएमटीः 1.00, 2.00
पनवेल-सीएसएमटीः 1.00, 2.30
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या (एसटी) ९२३२ बस निवडणूक आयोगाला आणि पोलिस प्रशासनाला देण्यात येणार आहेत. या बस १९ आणि २० नोव्हेंबर या दोन दिवसांसाठी प्रासंगिक भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. निवडणुकीच्या साहित्याची वाहतूक करण्यासाठी त्या महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. मात्र, या बसची मागणी दिवसातील ठरावीक कालावधीसाठी असल्याने नियमित प्रवासी वाहतुकीवर परिणाम होणार नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.