मुंबईकरांसाठी 300 नव्या लोकल्सचं गिफ्ट, या 8 स्थानकांचं रुपडं पालटणार

New Locals For Mumbai:  मोदी सरकारने मुंबईकरांसाठी खास गिफ्ट दिले आहे.

Pravin Dabholkar | Updated: Nov 29, 2024, 04:03 PM IST
मुंबईकरांसाठी 300 नव्या लोकल्सचं गिफ्ट, या 8 स्थानकांचं रुपडं पालटणार title=
मुंबई लोकल

300 New Locals For Mumbai: मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. मोदी सरकारने मुंबईकरांसाठी खास गिफ्ट दिले आहे. मुंबईमध्ये 300 नव्या लोकल ट्रेन्स दिल्या जाणार आहेत. तसेच वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल्स उभारले जाणार आहे. माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. 

समृद्ध आणि विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल टाकत 3 मोठ्या परियोजनांना केंद्राने मंजुरी दिली आहे. पोर्ट कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देण्यासाठी पूर्वांचल ते मुंबईलला जोडण्यासाठी कॉरीडोर तयार करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेतील परेल, एलटीटी, कल्याण आणि पनवेल या टर्मिनल्सची क्षमता वाढवण्यात येणारा आहे. 

रेल्वेने मुंबई सेंट्रल आणि वांद्रे स्थानकांची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जोगेश्वरीमध्ये नवी टर्मिनल्स आणि वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिलन्स उभारण्यात येणार आहे. मुंबई लोकल ट्रेन्समध्ये अतिरिक्त 300 ट्रेन्स जोडल्या जाणार आहेत. 

या परियोजनांमुळे लाखो मुंबईकरांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर होणार आहे. यासोबतच एमएमआर रिजनमध्ये कनेक्टिव्हिटी, व्यापार वाढणार असल्याचे फडणवीस यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर म्हटले आहे.

लवकरच सर्व लोकलचे रुपांतर एसी लोकलमध्ये?

महाराष्ट्र सरकारकडून लवकरच सर्व लोकलचे रुपांतर एसी लोकलमध्ये करण्यात येणार आहे. मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी प्रशासनाकडून हा प्रयत्न करण्यात येणार आहे. उन्हाळ्याच्या काळात लोकलमधील गर्दीमुळं प्रवाशांना खूप त्रास होतो. गर्दी आणि घामाच्या धाराने मुंबईकर हैराण होतात. एसी लोकलमुळं प्रवाशांचा त्रास वाचणार असून त्यांचा प्रवासही अधिक आरामदायी होणार आहे. एसी लोकलमुळं रेल्वेचे नेटवर्कमध्ये ही आधुनिकीकरण होईल. एसी लोकलमुळं प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील सुटेल. गर्दीमुळं व दरवाजात उभं राहिल्यामुळं अपघाताच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. धावत्या लोकलमधून होणारे प्रवाशांचे मृत्यू हा गंभीर प्रश्न होता. मात्र, एसी लोकलमुळं हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. एसी लोकलचे दरवाजे बंद असतात त्यामुळं नागरिकांचा प्रवास सुरक्षित होऊ शकतात. दरम्यान, मुंबई लोकलमधून दररोज 7.5 लाख नागरिक प्रवास करतात. जगातील सर्वात जास्त व्यस्त असलेले उपनगरीय रेल्वेचे जाळे आहे. मुंबईल लोकलचे जाळे 390 किमीपर्यंत पसरले आहेत. यात तिन प्रमुख मार्गिका आहेत. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्ग. या तिन्ही मार्गावर लोकल धावतात. पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांना वाढती मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे प्रशासनाने 27 नोव्हेंबरपासून 13 अतिरिक्त वातानुकूलित लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या 96 वरून 109 वर पोहोचली आहे.