भातसा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, धरणाचे ५ दरवाजे उघडले

शहापूर तालुक्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणा-या भातसा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या गोष्टीमुळे मुंबईकर सुखावले असले तरी धरणाची सुरक्षितता लक्षात घेऊन धरणाचे पाच दरवाजे 1.4 मीटरने उघडण्यात आले आहेत. 

Updated: Aug 21, 2017, 02:26 PM IST
भातसा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, धरणाचे ५ दरवाजे उघडले title=

मुंबई : शहापूर तालुक्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणा-या भातसा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या गोष्टीमुळे मुंबईकर सुखावले असले तरी धरणाची सुरक्षितता लक्षात घेऊन धरणाचे पाच दरवाजे 1.4 मीटरने उघडण्यात आले आहेत. 

धरणाचं पाणी सोडल्याने भातसा नदीच्या पाणीपात्रात वाढ झाली आहे. यामुळे आजूबाजूच्या 20 ते 25 गावांत पूरस्थिती निर्माण होऊन गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रशासनाकडून या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.