Gold Rate | सोने खरेदीसाठी 'सुवर्णसंधी', इतक्या रुपयांची घट, जाणून घ्या नवे दर

जाणून घ्या  (Golden Rate) सोन्याचे नवे दर.   

Updated: Jun 24, 2021, 06:48 PM IST
Gold Rate | सोने खरेदीसाठी 'सुवर्णसंधी', इतक्या रुपयांची घट, जाणून घ्या नवे दर title=

मुंबई : सोन्याच्या दरात (Golden Rate) गेल्या 2 दिवसांमध्ये दरवाढ झाली. पण गुरुवारी (24 जून) सोन्याच्या दरात घट झाल्याचं पाहायला मिळालं. रुपया मजबूत झाल्याने सोन्याच्या  दरात 93 रुपयांनी (Gold price today) घट झाली. त्यामुळे सोन्याचे नवे दर 46 हजार 283 रुपये प्रती तोळा इतके झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला चांदीच्या दरात वाढ झाली आहे. चांदीच्या दरात  99 रुपयाने वाढ झाली आहे. चांदीचे नवे दर 66 हजार  789 रुपये प्रती किलो इतके आहेत. (Golden prices fall by Rs 93 And silver prices rise by Rs 99 rupees know today Golden Silver Rate) 

COMEX  मध्ये सोन्याच्या दरात झालेली घट आणि रुपया मजबूत झाल्याने राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या दरात 93 रुपयांची घट झाली. गुरुवारी कामकाजाच्या सुरुवातीस डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य  9 पैशांनी वाढल्याने रुपया प्रति डॉलर 74 रुपये 18 पैशांवर बंद झाला. सोन्याच्या दरात घट झाल्याने गुंतवणूक करण्याची संधी आहे". 

बुधवारी सोन्याच्या दरात 110 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे बुधवारी सोन्याचे दर 46 हजार 396 रुपये प्रति तोळा इतके होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात साधारण वाढीसह 1 हजार 780 डॉलर प्रति औस आणि चांदीत घट होऊन 25.96 प्रति औस इतके दर आहेत. 

 

 

मुंबई आणि पुण्यातील दर

मुंबई आणि पुण्यात 22 कॅरेट सोन्याचे दर हे 46 हजार 190 रुपये प्रती तोळा इतके आहेत. तर 24 कॅरेट सोन्याचे दर हे 47 हजार 190 रुपये प्रति तोळा इतके आहेत. 

अशी तपासा सोन्याची शुद्धता 

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारने ‘BIS Care app’ हे अॅप लॉन्च केले आहे.  या अॅपद्वारे ग्राहकांना सोन्याची शुद्धता तपासता येईल. या अॅपमध्ये जर  लायसन्स, रजिस्ट्रेशन आणि हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक याची त्वरित तक्रार करु शकतो. या अॅपमुळे ग्राहकांची होणारी फसवणूक कमी होण्यास हातभार लागणार आहे.  

संबंधित बातम्या : 

Gold Price : वटपौर्णिमेला नवऱ्याकडे मागा सोन्याचा धागा