माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या ध्वजारोहण

स्वातंत्र्याच्या पंच्चाहत्तरी निमित्त केंद्र सरकार हर घर तिरंगा मोहिम राबवत आहे.

Updated: Aug 14, 2022, 08:49 PM IST
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या ध्वजारोहण title=

मुंबई : येत्या 15 ऑगस्ट रोजी भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे.  या स्वातंत्र्याच्या पंच्चाहत्तरी निमित्त केंद्र सरकार हर घर तिरंगा मोहिम राबवत आहे. या मोहिमेला जनतेकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या ध्वजारोहण करणार आहेत. या ध्वजारोहणाची आता शिवसैनिकांना उत्सुकता लागलीय.  

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दादरच्या त्यांच्या शिवसेना भवनाबाहेर तिरंगा फडकावणार आहेत. उद्या सकाळी 8.30 वाजता हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला असंख्य शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. या ध्वजारोहणाची आता सर्वच आतुरतेने वाट पाहातायत.  

दरम्यान केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा मोहिमेवर कॉंग्रेसचे राहूल गांधी यांनी टीका केली होती. या टीकेनंतर उद्धव ठाकरे यांनी देखील या मोहिमेवरून केंद्राला लक्ष्य केले होते. ज्यांच्याकडे घरच नाही ते तिरंगा लावणार कुठे? अशी विरोधात्मक प्रतिक्रिया त्यांनी या मोहीमेवर दिली होती. ठाकरे यांच्या टीकेवर भाजपकडूनही सणसणीत प्रत्युत्तर देण्यात आले होते.