मुंबई : मुंबई शहरातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत आगीच्या घटना समोर येत आहेत. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबईतील हे आगीचे सत्र सुरुच असल्याने मुंबईला आगीने वेढल्याचे चित्र आहे. पाहुयात गेल्या काही दिवसातील मुंबईतील आगीचे सत्र...
- १८ डिसेंबरला साकीनाक्यात भानू फरसाणच्या गोडाऊनला आग लागली...त्यामध्ये बारा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला....
- २९ डिसेंबरला कमला मिलमधल्या मोजो पब आणि वन अबाव्ह रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला
- नवं वर्ष उजाड़ल्यावर ४ जानेवारीला मुंबईत अंधेरीमध्ये मरोळच्या मैमून इमारतीत तिसऱ्या मजल्याला भीषण आग लागली. त्यात कपासी कुटुंबातल्या चार जणांचा मृत्यू झाला. एसीमध्ये स्पार्क होऊन ही आग लागली होती..
- मुंबईच्या लोअर पऱळ भागात सहा जानेवारीला सकाळी आग लागली.. लोअर परळच्या शिवशक्ती इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये ही आग लागली. एका कुरियरच्या ऑफीसमध्ये ही आग लागली..
- कांजूरमार्ग येथील सिने विस्टा स्टुडिओमध्ये लागलेल्या आगीत गोपी वर्मा या ऑडिओ असिस्टंटचा दुर्दैवी मृत्यू झाला.